Vidhansabha Sarkarnama
मुंबई

Budget Session Maharashtra : अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आरक्षण मुद्द्यावरून विरोधक आक्रमक

Amol Sutar

Mumbai : मराठा आरक्षणावरून विरोधकांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या वेळी 'फसवणूक नको आरक्षण द्या', 'महायुती सरकारचा जागर, आरक्षणाचे रोज नवीन गाजर' अशी घोषणाबाजी करण्यात आली.

मुंबई (Mumbai) येथे आजपासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. या वेळी विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले. विरोधकांनी पायऱ्यांवरच धिक्कार असो, मराठा समाजाच्या जिवाशी खेळणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा - ओबीसींची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत राज्य सरकारविरोधात निदर्शने केली.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर विधानसभा (Vidhansabha)आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी ही निदर्शने केली. घोषणा लिहिलेले फलक हाती घेत मराठा आणि ओबीसी समाजाची आरक्षणाच्या मुद्द्यावर फसवणूक करणाऱ्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, अमित देशमुख, नितीन राऊत, धीरज देशमुख, अमीन पटेल, राजेश राठोड, जितेश अंतापूरकर, भाई जगताप, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, नरेंद्र दराडे, राजन साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख, सुनील भुसारा, विनोद निकोले उपस्थित होते.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT