Ashok Chavan : चव्हाणांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या आजी अन् माजी आमदारांचं वाढलं टेन्शन

Nanded Congress Mla News : नांदेड जिल्ह्यात चव्हाणांसह चार काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. त्यातील तीन आमदारांनी काँग्रेसबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, पण...
Ashok Chavan
Ashok Chavansarkarnama
Published on
Updated on

भाजपत अशोक चव्हाण यांच्या नव्या राजकीय इनिंगला दमदार सुरुवात झाली आहे. काँग्रेस सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर दोन दिवसांनी चव्हाणांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. पण, चव्हाणांनी पक्ष सोडल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांचं टेन्शन वाढलं आहे.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांचे वर्चस्व राहिले आहे. चव्हाणांच्या शिफारसीनं कोणी आमदार झाले, तर कोणी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य. नांदेड जिल्ह्यात चव्हाणांसह चार काँग्रेसचे ( Congress ) आमदार निवडून आले आहेत. तीन आमदारांनी सध्या तरी काँग्रेसबरोबर राहण्याची भूमिका घेतली आहे. ‌

Ashok Chavan
Chhagan Bhujbal : "दोन नाटकांच्या स्क्रिप्टवर काम करतोय, पहिली...", फडणवीस-जरांगे वादावर भुजबळांची टोलेबाजी

हादगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर हे अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. हादगावची राजकीय परिस्थिती पाहता येथे शिवसेना शिंदे गट ( Shivsena Shinde Group ) प्रभावी आहे. त्यामुळे इच्छा असूनही आमदार जवळगावकर चव्हाणांबरोबर जाऊ शकत नाहीत.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना शिंदे गट प्रबळ आहे. भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांचा दोन वेळा या मतदारसंघातून थोडक्यात पराभव झाला आहे, तर खासदार हेमंत पाटील या मतदारसंघातून 2014 मध्ये निवडून आले होते. या राजकीय परिस्थितीत काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे यांनी पक्षातच राहणे पसंत केले आहे. त्यांची ओळख अशोक चव्हाणांचे कट्टर समर्थक म्हणून आहे.

Ashok Chavan
Manoj Jarange Patil : "फडणवीसांना सुट्टी नाही अन् आणखी...", जरांगे-पाटलांचा थेट इशारा

नायब व मुखेड या दोन मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. मुखेडचे माजी आमदार हानुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि नायगावचे माजी आमदार वसंतराव चव्हाण हे अशोक चव्हाणांचे समर्थक आहेत. स्थानिक आमदार भाजपचे असल्याने या काँग्रेसच्या दोन्ही माजी आमदारांच्या अडचणीत भर पडली आहे.

देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचा दबदबा आहे. या मतदारसंघांचे आमदार जितेश अंतापूरकर हे नेतृत्व करतात. त्यांची परिस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी झाली आहे.

Ashok Chavan
Nitesh Rane Vs Jarange : "...तर सागर बंगल्याची भिंत ओलांडणं अवघड जाईल", राणेंचा जरांगे-पाटलांना थेट इशारा

नांदेड जिल्ह्यातील अशोक चव्हाणांच्या समर्थकांची स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीमुळे चांगलीच घालमेल झाली आहे. येणाऱ्या काळात अशोक चव्हाणांचे समर्थक काँग्रेसमध्ये राहतात की भाजपत उडी मारतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

Ashok Chavan
Lok Sabha Election 2024 : ‘मी आता कुणाच्याच पंगतीला बसणार नाही; लोकसभेचे मैदान शेतकऱ्यांच्या जिवावर मारणार’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com