Eknath Shinde and Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics: शिंदे, फडणवीसांची मंत्र्यांबरोबर बंद दाराआड चर्चा; सरकारमधील समन्वयासाठी सूचना

Cabinet Meeting : "महायुतीमधील मतभेद बाहेर जात असतील तर..."; मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे टोचले कान

Ganesh Thombare

Mumbai News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत 11 मोठे निर्णय घेण्यात आले.

यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय घेण्यात आला. तर मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांबरोबर बंद दाराआड जवळपास 20 ते 25 मिनिटे चर्चा केली.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना सरकारमध्ये समन्वय ठेवण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. "राज्याला पुरोगामी विचारांची परंपरा असून महायुतीमधील मतभेद बाहेर जात असतील तर ते चुकीचे आहे, त्यामुळे समन्वय ठेवण्याची सरकारची जबाबदारी आहे", अशा सूचना करत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांचे कान टोचले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर पाठवून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ सरकारमधील मंत्र्यांसोबत दुसरी बैठक घेत मंत्र्यांचे कान टोचले. "महायुतीत विसंवाद असल्याचे चित्र बाहेर जनमाणसांत जावू नये, यासाठी समन्वय ठेवा", असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

"राज्याची पुरोगामी परंपरा आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होता कामा नये, याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. महायुतीच्या बैठकीनंतर देखील मतभेद बाहेर येत असतील तर ते चुकीचे आहे. दिवाळीमध्ये वातावरण बिघडू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत", असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावरुन वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केले. त्यानंतर धनगर समाजही आरक्षण मिळण्यासाठी आक्रमक झाला.

तर दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी करत ओबीसींनी दंड थोपटले. तर बीडमध्ये काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या, या सर्व पार्श्वभूमीवर सरकार आता अलर्ट झालं असून मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

Edited By - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT