Cabinet Meeting Decision : राज्य सरकारची धनगर समाजासाठी मोठी घोषणा, मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 'हे' आहेत धडाकेबाज निर्णय

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक....
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले.त्यापाठोपाठ धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलनाचं अस्त्र उपसलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, अशी मागणी घेऊन ओबीसींनी दंड थोपटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी नेत्याची भेट घेऊन त्यांना लेखी आश्वासन दिले.या सगळ्या घडामोडींवर राज्य मंत्रिंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे.

Eknath Shinde
Shivaji Maharaj Statue : कुपवाड्यातील पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा ठरला ‘टॉप ट्रेंडिंग’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रिमंडळ बैठक झाली.या बैठकीत काही महत्वाचे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.यात धनगर समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय घेतला असून शक्तिप्रदत्त समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचसोबत मुंबईतील नरिमन पॉईंट याठिकाणी असलेली एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहितीदेखील समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय :

इतर मागास बहुजन कल्याण : धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तिप्रदत्त समिती.

* उद्योग विभाग : राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. 4250 कोटी तरतुदीस मान्यता

* जलसंपदा विभाग : मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार.

* वैद्यकीय शिक्षण : अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार. (Cabinet Meeting)

* राज्य मंत्रिमंडळात शेतकऱ्यांसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केलंय. या योजनेसाठी तब्बल 4 हजार 250 कोटींची तरतूद...

* वस्त्रोद्योग विभाग : मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा.

इतर मागास बहुजन कल्याण * गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची 282 पदे भरणार

* सहकार विभाग : विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा

* पर्यटन विभाग: मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार

* गृह विभाग :बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार

Eknath Shinde
ACB Action News : जनजागृती सप्ताह संपताच पुन्हा लाचखोरीला सुरुवात; एसीबीची धडक कारवाई!

* पशुसंवर्धन : महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार

* सार्वजनिक बांधकाम विभाग: नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले.एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ

(Edited By Deepak Kulkarni)

Eknath Shinde
Bhanudas Murkute News : माजी आमदार मुरकुटेंनी सरकारला करुन दिली 'त्या' निर्णयाची आठवण ; म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com