Prakash Shendge News : मराठा आरक्षणाचा पोपट मेला, त्यांनी EWS चा लाभ घ्यावा; ओबीसी नेते शेंडगेंचे विधान..

Prakash Shendge News : "ओबीसींना रस्त्यावरची लढाई करण्याशिवाय पर्याय नाही...."
Prakash Shendge News :
Prakash Shendge News :Sarkarnama
Published on
Updated on

Prakash Shendge News : एकीकडे मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये राज्यात संघर्ष सुरू असताना ओबीसी आरक्षणाबाबतचा अध्यादेश रद्द करण्यात यावं, अशी याचिका मराठा समाज आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यामुळे मराठा आणि ओबीसी असा वाद आता सुरू होण्याची शक्यता आहे, यावर आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी खुला इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

Prakash Shendge News :
PM Modi On OBC : महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा-ओबीसी वाद पेटलेला असताना PM मोदींचं मोठं वक्तव्य...

प्रकाश शेंडगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने याआधीच सांगितलं आहे की, मराठा समाज मागासलेला नाही. मराठा आरक्षणाचा पोपट केव्हाच मेला आहे. मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकामधून आरक्षण घ्यावं, हाच एकमेव मार्ग मराठा समाजाने अवलंबला तर मराठा-ओबीसी संघर्ष उद्भवणार नाही, अशी भूमिका ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मांडली आहे.

Prakash Shendge News :
OBC Reservation Petition : ओबीसी आरक्षणाविरोधातल्या याचिकेवर 3 जानेवारीला पुढची सुनावणी; हायकोर्टाचा अल्टिमेटम...

शेंडगे पुढे म्हणाले, "ओबीसींची संख्या ३२ टक्के आहे. या ३२ टक्क्यात कुणबी मराठा आहे. मराठा कुणबी आहे, लेवा पाटील आहे, लेवा पाटीदार आहे, असं मिळून ते 32 टक्के संख्या आहे. यातून हे वजा केले तर मराठा समाजाची संख्या राहते किती? त्यामुळे सर्वांनी समंजसपणाची भूमिका घेणे आवश्यक आहे. जर सरकारने सरसकट कुणबी नोंदी द्यायला सुरूवात केली तर ओबीसींना रस्त्यावरची लढाई करण्याशिवाय पर्याय नाही," असा इशारा शेंडगे यांनी दिला.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com