Bogus Candidate: निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार काय उद्योग करतील सांगता येत नाही. राखीव जागा बळकावण्यासाठी बनावट जात प्रमाणपत्रांद्वारे गैरप्रकार करणाऱ्यांचा तर सुळसुळाट झालेला आहे. अशा एका प्रकरणात मुंबईतील एका नेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे बनावट जात प्रमाणपत्राद्वारे निवडणूक लढवल्याबद्दल या नेत्यावर तब्बल २० वर्षांनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळं निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाच्या अत्यंत ढिसाळ कामगिरीचं हे अत्यंत बोलकं उदाहरण आहे.
चेंबूरमधील माजी बीएमसी नगरसेवक रमेश कांबळे यांच्यावर बनावट जात प्रमाणपत्राच्या आरोपावरून तब्बल २० वर्षांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे यांनी १९९८ मध्ये अनुसूचित जातीचे (SC) बनावट प्रमाणपत्र मिळवून २००२ मध्ये आरक्षित जागेवरून निवडणूक जिंकली, असा आरोप पोलिसांनी केला आहे.
२००५ मध्ये जात पडताळणी समितीनं त्यांचं प्रमाणपत्र बनावट ठरवलं होतं, तसंच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानंही हा निर्णय कायम ठेवला होता. तरीही त्यावेळी गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र आता तक्रारीनंतर चेंबूर पोलिसांनी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे वापरण्याचे गुन्हे नोंदवले आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे द्यावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.