Mumbai Police News: केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय)ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कंपनीविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. आवश्यक पुरावे नसल्याचे सीबीआयने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. या क्लोजर रिपोर्टमुळे पांडेंना मोठा दिलासा मिळाला आहे.
पांडे यांनी स्थापन केलेल्या आयसेक सर्विसेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खटल्यात को-लोकेशन स्कॅम प्रकरणी NSE च्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्णा यांना देखील अटक झाली होती.
को-लोकेशनच्या मदतीने NSE मधील अल्गोरिथामिक ट्रेडिंग करणाऱ्या दलालांच ऑडिट करताना सेबी नियमांच उल्लंघन झाल्याचा त्यांच्यावर आरोप होता. खटला चालवण्याएवढे पुरेसे पुरावे नसल्याचे सीबीआयने आपल्या अहवालात म्हटले आहे.
या खटल्याचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयने विशेष कोर्टासमोर सादर केला आहे. पुढची सुनावणी 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. आयसेकनं ऑडिट केलेल्या दोन स्टॉकब्रोकर्सचं ऑडिट केलं होतं. या ऑडिटमध्ये अनेक गैरप्रकार आढळल्याचा आरोप सीबीआयनं केला होता. मात्र पुरेसे पुरावे न सापडल्यानं आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. कोर्ट निर्णय स्वीकारणार की फेटाळणार, हे १४ तारखेला समजेल.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.