Nana Patole, Balasaheb Thorat News  Sarkarnama
मुंबई

Balasaheb Thorat News : बाळासाहेब थोरात भाजपमध्ये येणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले

Chandrasekhar Bawankule News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole, Balasaheb Thorat News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी पक्ष श्रेष्टींनाही त्या संदर्भात पत्र पाठवले होते. थोरात यांच्या राजीनाम्यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनीही भाष्य केले आहे.

बावनकुळे म्हणाले की, बाळासाहेब थोरातच नाही तर कोणालाही भाजपामध्ये यायचे असेल तर त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे उघडे आहेत. ते जर आले तर त्यांचा योग्य सन्मान राखू, काँग्रेसमध्ये (Congress) त्यांच्या असलेल्या उंची पेक्षा त्यांना मोठे स्थान, देऊ असे मत बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे.

बाळासाहेब थोरात यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न बावनकुळे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी पक्ष वाढीसाठी खूप काम केले. विधकमंडळाचे ते 9 वेळा सदस्य राहिले आहेत.

तसेच पक्षांच्या वागणुकीमुळे थोरांताना पदाचा राजीनामा द्यावा लागणे ही खूप गंभीर बाब आहे. माझ्यावर जर थोरात यांच्या ऐवढा मोठा नेता नाराज झाला असता तर विचार केला असता, असा टोला बावनकुळे यांनी पटोले (Nana Patole) यांना लगावला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबेंना यांना मदत केली, याचा अर्थ आम्ही त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली असा होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते भाजपमध्ये येऊ शकतात. आमची दारे त्यांच्यासाठी उघडी आहेत, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT