Chandrashekhar Bawankule Vs Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

BJP Vs Uddhav Thackeray: ठाकरेंची 'सौगात-ए-मोदी'वरुनची टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी; बावनकुळेंचं खोचक प्रत्युत्तर; म्हणाले...

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदेशीर मार्गाने गुन्हेगार,बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना संरक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करत आहेत.पण आता उद्धव ठाकरेंना हेच लोकं का प्रिय झाले आहेत? असंही बावनकुळे म्हणाले.

Deepak Kulkarni

Mumbai News : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सौगात-ए-मोदी या उपक्रमावर जोरदार टीका केली होती. सौगात-ए-मोदी नाही, तर हे सौगात-ए-सत्ता असल्याचा हल्लाबोल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मोदी सरकारवर केला होता. याच त्यांच्या टीकेला आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी गुरुवारी(ता.27)माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. अहोरात्र जनसेवेचा ध्यास घेऊन देशसेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर बोलण्याची उद्धव ठाकरे यांची पात्रता नसल्याची खरमरीत टीका त्यांनी यावेळी केली.

तसेच भाजपचा 'सौगात-ए-मोदी' हा कार्यक्रम नसून विकासाची गॅरंटी आहे. मोदी यांच्या सरकारने देशाला 24 तास वीज,पाणी,रस्ते,घरं आणि रोजगार दिला. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेला काय दिले? मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर असताना ते घरात बसून राहिले आणि स्वतःच्या कार्यकर्त्यांशी नाळ तोडून टाकल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

बावनकुळे म्हणाले,हिंदुत्व आमच्या डीएनएमध्येच आहे,पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा त्याग केला असून आता ते औरंगजेब फॅन क्लबचे म्होरक्या झाले आहेत. सत्तेसाठी हिंदुत्वाचा वारसा सोडून काँग्रेसच्या दारात जाऊन ते बसले आहेत. त्यामुळेच जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे तुमचे आवडते काम दिले आहे. म्हणून आता तुम्हांला हिंदुत्वावर बोलण्याचा कोणताही अधिकार राहिला नसल्याचा खोचक टोलाही बावनकुळे यांनी यावेळी लगावला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायदेशीर मार्गाने गुन्हेगार,बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्या आणि समाजविघातक तत्त्वांना संरक्षण देणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करत आहेत.पण आता उद्धव ठाकरेंना हेच लोकं का प्रिय झाले आहेत? याचं उत्तर त्यांनी आधी जनतेला द्यायला हवं, असा चिमटाही बावनकुळे यांनी ठाकरेंना काढला.

उद्धव ठाकरेंनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता झाल्यानंतर गुरुवारी(ता.27) पत्रकार परिषद घेत महायुती सरकारच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती.तसेच त्यांनी मोदी सरकारनं ईदच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या सौगात-ए-मोदी कार्यक्रमावरही हल्ला चढवला होता.

केंद्रातील सरकारचा सौगात-ए-मोदी नाही,तर हे सौगात-ए-सत्ता असा हा उपक्रम आहे.सत्तेसाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात,याचं एक हे निर्लज्य उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले.ही सोगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपुरती राहणार आहे की नंतर सुद्धा राहणार आहे,हे आधी भाजपनं जाहीर करावं असेही ठाकरे म्हणाले होते.

तसेच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं,त्यातून केवळ सत्ताधाऱ्यांच्या पाशवी बहुमताचा माज दिसला. अधिवेशन काळात देशाला,राज्याला चांगलं गाणं मिळालं. तेवढंच काय ते अधिवेशनाचं फलित म्हणावं लागेल, अशी खोचक टिप्पणीही ठाकरेंनी यावेळी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT