Kunal Kamra: संकटात सापडलेल्या कामराच्या मदतीसाठी भारतासह त्याचे जगभरातले समर्थक एकवटले; दोनच दिवसांत 4 कोटी....

Kunal Kamra Fans Donate Lakhs Of Money After Eknath Shinde Controversy: स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराचा भारतासह इतर देशातही मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होताना दिसून येते. पण सध्या भोवर्‍यात सापडलेल्या कुणाल कामराच्या मदतीसाठी त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे समर्थक धावून आल्याचे पाहायला मिळत आहे.
Kunal Kamra
Kunal KamraSarkarnama
Published on
Updated on

Kunal Kamra News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आपल्या गाण्यामधून अप्रत्यक्षपणे टार्गेट केल्यानं स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे. कुणाल कामराविरोधात शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून शिवसेनेकडून कामराविरुद्ध मनमाड,गुन्हा दाखल करण्यात आला असून खार पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे अडचणी आलेल्या कुणाल कामराच्या (Kunal Kamra) बँक खात्यात 4 कोटींपेक्षा जास्त रक्कम दोनच दिवसांत जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराचा भारतासह इतर देशातही मोठा चाहता वर्ग आहे. त्याच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होताना दिसून येते. पण सध्या भोवर्‍यात सापडलेल्या कुणाल कामराच्या मदतीसाठी त्याच्यावर प्रचंड प्रेम करणारे त्याचे समर्थक धावून आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी अक्षरश: गेल्या दोन तीन दिवसांतच कोट्यवधी रुपयांची आर्थिक मदत कुणालच्या खात्यावर पाठवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी,सर्वोच्च न्यायालय यांच्यावरच्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावरील वादग्रस्त गाणं सादर करत कुणाल कामरानं नवा वाद ओढवून घेतला आहे. यामुळे महायुती आणि शिवसेना संतापली असताना त्याच्यासमोर कायदेशीर अडचणीही वाढण्याची शक्यता आहे.

Kunal Kamra
Shivsena Vs Kunal Kamra : ...म्हणून आम्ही शांत,पण आता कामराला टायरमध्ये घालून थर्ड डिग्री देणार; 'या' मंत्र्यांमधला शिवसैनिक जागला

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने विडंबनात्मक काव्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला होता. त्यावरुन संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट हॅबिटॅट स्टुडिओ फोडला होता. आता शिवसेनेकडून कुणाल कामरावर माफीसाठी प्रचंड माफीसाठी दबाव टाकला जात आहे.

तर दुसरीकडे कुणाल कामरावरुन अधिवेशनातही सत्ताधारी-विरोधकांमध्ये उडालेल्या खटक्यानंतर राजकीय वातावरणही चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच राजकीय नेत्यांना मुद्दामहून टार्गेट करणार्‍यांना धडा शिकवणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर कामराला पोलिसांकडून चौकशीसाठी समन्सही बजावले आहे. यामुळे कामरा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची दाट शक्यता आहे.

Kunal Kamra
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, अधिवेशनाने एक छान गाणं दिलं! तुमचे मनोरंजन झाले हे काही कमी नाही, शिरसाट यांचा टोला..

याचवेळी मात्र, कुणाल कामराला देशविदेशातून मिळत असलेला पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्याला कायदेशीर लढा उभारण्यासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचा ओघ सुरू असल्याचं दिसून येत आहे.अवघ्या दोनच दिवसांत त्याच्या खात्यात तब्बल चार कोटी 7 लाख 80 हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.

कुणाल कामराला करण्यात येत असलेल्या मदतीमध्ये 400 ते 10 हजार रुपयांपर्यंतची मदत भारतात राहणार्‍या त्याच्या समर्थकांकडून करण्यात आली आहे. तसेच अमेरिका,कॅनडा, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती यांसह विविध देशांतून त्याच्यासाठी आर्थिक मदत पाठवली जात असल्याचं पुढं आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com