Ranjit Kasale Extortion Scandal : धनंजय मुंडेंवर आरोप करणारा रणजित कासले अडचणीत, एक कोटीची खंडणी मागतानाचा व्हिडिओ समोर

Ranjit Kasale Caught on Camera Seeking 1 Crore Extortion : रणजित कासले याने चुकीच्या पद्धतीने आपल्याला निलंबित केल्याचा आरोप केला होता. तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर देखील टीका केली होती.
Ranjit Kasale
Ranjit Kasale sarkarnama
Published on
Updated on

Ranjit Kasale News : निलंबित पीएसआय रणजित कासले यांनी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या अडवल्यामुळे आपली बदली केल्याचे म्हटले होते. तसेच आपण मनोजदादा जरांगे यांचे नाव घेतल्याने आपल्या कारवाई केल्याचा दावा देखील कासले यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केला होता. मात्र कासले याचा समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात तो तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागताना दिसत आहे.

रणजीत कासले यांनी गुजरातमध्ये जाऊन एक कोटी रुपयाची मागणी करतानाचा व्हिडिओ आणि पैसे घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच काही फोटोग्राफही समोर आले आहेत ज्यात बंदूक ठेवून दहशत निर्माण करत असल्याचे दिसत आहे.

Ranjit Kasale
Kunal Kamra: संकटात सापडलेल्या कामराच्या मदतीसाठी भारतासह त्याचे जगभरातले समर्थक एकवटले; दोनच दिवसांत 4 कोटी....

निलंबित पीएसआय कासले याच्यावर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता गुजरातमध्ये जाऊन वसुली करत असल्याचा आरोप आहे. त्या संदर्भातील पैसे घेतलेले स्क्रीन शॉट गुजरातमधील एका न्यूज मीडियाने एक्स पोस्टवर (ट्विटरवर) टाकले आहेत.

...म्हणूनच कारवाई

कासले हा व्हिडिओ करून आपल्याला चुकीच्या पद्धतीने निलंबित केल्याचा आरोप करत आहे. तसेच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या गाड्या आडवल्याचा दाव करत असल्याने या प्रकरणाला संवेदनशील वळन मिळाले होते. मात्र, कासले याच्या विरोधात खंडणीचे पैसे मागण्याचा डोस पुरावा असल्यानेच तसेच विनापरवानगी गुजरातमध्ये जाऊन आर्थिक मागणी करणे व सायबर गुन्ह्याची भीती दाखवून पैसे उकळणे असे अनेक आरोपाचे पुरावे असल्याने बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी त्याच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.

Ranjit Kasale
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट, स्कॉर्पिओ वाहनाच्या फॉरेन्सिक रिपोर्टमुळे फास आवळला, धक्कादायक गोष्टी उघड

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com