Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Chhagan Bhujbal : संजय राऊतांशी भेट झाली? छगन भुजबळांनी कधी काय झालं, ते सगळंच सांगितलं

Ajit Pawar NCP : आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही नाराजच आहेत. मात्र आता सर्वजण कामाला लागले, असेही भुजबळ म्हणाले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असून ते शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. खासदार संजय राऊत यांनीही भुजबळ ठाकरे गटात असते तर त्यांना मुख्यमंत्री पदाचा टिळा लागला असता, असे सूचक विधान केले. त्यामुळे सुरू असलेल्या चर्चांना अधिकच बळ मिळाले. मात्र या चर्चा साफ खोट्या असून मी कुठेही जाणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत छगन भुजबळांनी ते ठाकरे गटातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

भुजबळांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना ते नाराज असल्याच्या चर्चांचे खंडन केले. तसेच ते कोणत्या दिवशी कोठे होते, हे सांगून कुणालाही भेटण्याचा प्रश्नच येत नाही, असेही स्पष्ट केले. ते म्हणाले, छगन भुजबळ Chhagan Bhujbal अजिबात नाराज नाही. कुणीही काहीही चर्चा करणार त्याला मी काहीही करू शकत नाही. आता मी कुणालाही भेटलेलो नाही. आता सुरू असलेल्या चर्चा साफ खोट्या आहेत.

मी विरोधी पक्षातील कुठल्याही नेत्यांना भेटलेलो नाही. त्यांना कधी भेटणार? १० जूनला षन्मुखानंद हॉलमधील कार्यक्रमाला उपस्थित होतो. ११ तारखेला आमच्या लोकांशी राज्यसभेच्या फॉर्म भरण्याबाबत चर्चा केली. १२ तारखेला अजित पवारांच्या घरी मिटिंग होती. १३ तारखेला फॉर्म भरण्यासाठी विधानसभेत होतो. १४ तारखेला पुण्यात होतो. १५ जूनला येवल्यात होतो. तर १६ ला मुंबईत आलो. काल सोमवारी आणि आज मंगळवार, त्यामुळे मी कधी कुणाला भेटणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

मला कुणाला भेटायचे असेल तर मी सर्वांना सांगून भेटेल. त्यावेळी प्रसारमाध्यमांना सांगणार. आता माझ्याबाबत चर्चा होतात हे माझे दुर्दैव्य आहे. राजकारणात कायम नाराज राहून जमत नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi, राहुल गांधी, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेही नाराजच आहेत. मात्र आता सर्वजण कामाला लागले, असेही भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT