Mumbai News : राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारला जाहीर पाठींबा देत सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे महायुतीतील नेते चांगलेच हैराण झाले आहेत. महायुतीत सहभागी असतानाही भुजबळ चुकीची विधान करत महायुतीला अडचणीत आणत आहेत. भुजबळांना नेमकं काय पाहिजे ते देऊन टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे.
महायुतीत अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाला आहे. अजित पवार यांच्या गटातील काही नेत्यांना सत्तेत संधी देखील देण्यात आली आहे. असे असतानाही अजित पवार गटाचे नेते भुजबळ गेल्या काही दिवसांपासून चुकीची विधाने करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीमधील वातावरण गढूळ होत चालले आहे. त्यांना नक्की काय पाहिजे ते देऊन टाका, अशी मागणी करत माझी स्पष्ट भूमिका आहे की, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे, असेही आमदार शिरसाट म्हणाले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने भुजबळ आपल्या पक्षनेतृत्त्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्याने राज्यसभेत जाण्याचीही त्यांची संधी देखील हुकली आहे.त्यामुळे आता त्यांनी विधानसभेचे जागावाटप तरी वेळेत व्हावे अशी अपेक्षा केली आहे.
छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार गटातील नेत्यांना कडक शब्दात सुनावले आहे. शिरसाट म्हणाले, छगन भुजबळ नक्की कोणत्या गोष्टींवर खुष होतात, यावर संशोधन केले पाहिजे. मतदारसंघाच्या वेळीही आणि आताही त्यांची नाराजी आहेच. त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याने यावर भाष्य करणे योग्य नाही. त्यांच्या पक्षातील नाराजी असली तरीही त्याचा परिणाम महायुतीवर होतो. त्यामुळे हे महायुतीला हे परवडणारे नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर काहीतरी निर्णय घेतला पाहिजे.
लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेले अपयश हे उशीरा जागांचे वाटप करण्यात आल्याने मिळाले आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता तातडीने जागांचे वाटप करावे, अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केली आहे. महायुतीमधील मित्र पक्षांनी एकत्र बसून तिकिट वाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ काय ठरवायचे आहे ते लवकर ठरवा. कारण, विधानसभेसाठी पवार साहेब कामाला लागले आहेत. प्रचार सुरू झाला. आता प्रचाराला सुरुवात करावी लागली. आपण चर्चेचे गुऱ्हाळ करत राहिलो तर परत अडचणीत येऊ, असेही भुजबळ यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.