Bala Nandgaonkar visits Chhagan Bhujbal after his surgery, reflecting Maharashtra’s political culture where ideological differences do not break personal respect. Sarkarama
मुंबई

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांवर शस्त्रक्रिया होताच ठाकरेंचा शिलेदार भेटीला : सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाले, 'मतभेद असावे पण...'

Chhagan Bhujbal Surgery Bala Nandgaonkar Visit : मा.बाळासाहेब व एकूणच ठाकरे परिवारातील जुन्या आठवणी, आधीच्या काळातील केलेला संघर्ष त्यातून मिळविलेले यश, राजकारणाची बदलेली शैली याबद्दल ते मनापासून व्यक्त झाले. हॉस्पिटल मध्ये असले आणि शस्त्रक्रिया झाली तरी एकदम मनापासून ते व्यक्त होत होते. आम्ही दोघेही जुन्या गोष्टी आठवून भाऊक झालो.

Jagdish Patil

Mumbai News, 14 Dec : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भुजबळ यांच्यावरील शस्त्रक्रियेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा राज ठाकरेंचे शिलेदार अशी ओळख असलेले बाळा नांदगांवकर यांनी भुजबळ यांची भेट घेतली आहे.

या दोघांच्या भेटीची माहिती बाळा नांदगांवकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये छगन भुजबळ आणि बाळा नांदगावकर दिसत आहेत.

शिवाय हा फोटो शेअर करत बाळा नांदगांवकरांनी आपल्या पोस्टमध्ये ' आपल्या राज्याची संस्कृती आहे की आपल्या इथे राजकीय विरोधक असतात पण दुश्मन नव्हे. कारण राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे.', लिहिलं आहे. त्यांच्या या भावनिक पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

नांदगांवकरांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?

बाळा नांदगांवकरांनी फेसबुकमध्ये लिहिलं की, "मतभेद असावे, मनभेद नसावे. राज्यातील ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ साहेब यांची आज भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. यावेळी त्यांच्याबरोबर जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिवसैनिक म्हणून काम करत असताना भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते होते.

दोघांमधील सारखा दुवा म्हणजे "ठाकरे परिवार". दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांनी ही मनापासून आनंद व्यक्त केला. त्यांची आणि माझी राजकीय विचारधारा नंतरच्या काळात वेगळी असली तरी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याबद्दल मनात आदरच आहे. वयाच्या या टप्प्यात ही त्यांचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांचा लढवय्या स्वभाव. अनेकदा प्रवाहाविरोधात जाऊन लढणारे भुजबळ साहेब वयाच्या या टप्प्यात ही लढवय्ये आहेत.'

मा.बाळासाहेब व एकूणच ठाकरे परिवारातील जुन्या आठवणी, आधीच्या काळातील केलेला संघर्ष त्यातून मिळविलेले यश, राजकारणाची बदलेली शैली याबद्दल ते मनापासून व्यक्त झाले. हॉस्पिटल मध्ये असले आणि शस्त्रक्रिया झाली तरी एकदम मनापासून ते व्यक्त होत होते. आम्ही दोघेही जुन्या गोष्टी आठवून भाऊक झालो.

आपल्या राज्याची संस्कृती आहे की आपल्या इथे राजकीय विरोधक असतात पण दुश्मन नव्हे. कारण राजकारणात मतभेद असावे पण मनभेद नसावे. ही संस्कृती हळूहळू लुप्त होत आहे असे सध्या जाणवते आहे. राजकारणातील धडधडती तोफ म्हणून ओळखले जाणारे भुजबळ साहेब हे लवकरात लवकर स्वस्थ होऊन परत सक्रीय व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना', अशी नांदगावकरांनी भावूक पोस्ट लिहिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT