Harshawardhan Sapkal : 'राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला...', हिवाळी अधिवेशनावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Harshawardhan Sapkal on Devendra Fadnavis : 'सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करणं हे संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि अनिवार्य आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधर्म पाळत नाही. राजधर्म न पाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि या सरकारला अधर्मी म्हटले पाहिजे.'
Harshawardhan Sapkal on BJP News
Harshawardhan Sapkal on BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 14 Dec : नागपुरमध्ये महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशना संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना प्रश्न विचारला असता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.

राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशा शब्दात फडणवीसांवर निशाणा साधला. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, 'विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून या अधिवेशनात विरोधकांनी विविध मागण्या केल्या आहेत.

मात्र, या मागण्या पूर्ण होणार की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जातायत. नुसत्या घोषणांचा पाऊस न पाडता, शेतकऱ्यांना थेट दिलासा देणे, गरजेचे आहे.' तर राज्याचे हिवाळी अधिवेशन म्हणजे राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

Harshawardhan Sapkal on BJP News
Vijay Wadettiwar : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे पाप महायुती सरकारचेच, कायदा सुव्यवस्था अन् भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून वडेट्टीवारांनी सरकारवर सुनावलं

शिवाय बिबट्या सारखे विषय या ठिकाणी मांडले आणि महाराष्ट्रचे प्रश्न बाजूला राहिले. सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करणं हे संविधानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आणि अनिवार्य आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजधर्म पाळत नाही.

राजधर्म न पाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि या सरकारला अधर्मी म्हटले पाहिजे, अशी बोचरी टीका त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. कारण संविधानाच्या सर्व तरतूदी त्यांना मान्य नाहीत. एक वर्ष निवडणूका होऊनही सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळत नाही.

Harshawardhan Sapkal on BJP News
Amit Shah Vs Devendra Fadnavis : अमित शाहांचा 'डबल गेम'; देवेंद्र फडणवीसांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंना ताकद, खासदाराचा खळबळजनक दावा

त्यामुळे फडणवीसांना निंदकाचे घर असावे शेजारी हा संदेश मान्य नाही, असंही सपकाळ यावेळी म्हणाले. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्ते आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी याबाबत निर्णय घेतील असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com