Pune BJP : भाजपकडून मुलाखतीची 'दिखावेगिरी', आधीच उमेदवार ठरले, यादी देखील तयार! इच्छुक 'गॅसवर'!

Pune BJP Municipal Election Candidate List : भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मात्र, या मुलाखमीमध्ये केवळ दिखावेगिरी असल्याची चर्चा आहे. मात्र, उमेदवारांची यादी आधीच तयार असल्याची बोलले जात आहे.
Pune BJP
Pune BJPsarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत. पुण्यामध्ये सर्वाधिक 2300 इच्छुकांनी भाजपकडे अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर आता भाजपकडून दुसऱ्या टप्प्यांमध्ये या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत.

13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवार अशा दोन दिवस चालणाऱ्या या मुलाखतींच्या पहिल्या दिवशी तब्बल 980 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सकाळी साडेनऊला सुरू झालेल्या या मुलाखती रात्री साडेआठ पर्यंत सुरू होत्या. तब्बल 11 तासांमध्ये 980 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

मुलाखतीसाठी पूर्ण तयारीनिशी आलेल्या इच्छुकांच्या अवघ्या एक ते पाच मिनिटाच्या आत या मुलाखती उरकण्यात आल्या. माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांना पाच मिनिटांचा वेळ दिला तर इतरांच्या मुलाखती अवघ्या एक ते दोन मिनिटांमध्ये उरकण्यात आल्या असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

या मुलाखतीसाठी जबाबदारी भाजपने पुण्यातील काही वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे. यामध्ये महानगरपालिका निवडणुकीची ज्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती त्यांचा समावेश होता. गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी ह्या मुलाखतीचे सोपस्कार उरकला.

गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या निवडणुका आता होत असल्याने आणि त्यात भाजपची पुण्यामध्ये चांगली ताकद असल्याने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये निवडणुकीसाठी प्रचंड असा उत्साह आहे. आणि तोच उत्साह इच्छुकांच्या अर्ज भरताना देखील पाहायला मिळाला. पक्षाकडून सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आस अनेक जण लावून बसले आहेत. मात्र, 100 उमेदवारांची यादी यापूर्वीच वरिष्ठांकडे पोचली असल्याचे सांगितलं जात आहे. त्यामुळे मुलाखती म्हणजे केवळ दिखावा असल्याची चर्चा आहे.

Pune BJP
Harshawardhan Sapkal : 'राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला...', हिवाळी अधिवेशनावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा फडणवीसांवर हल्लाबोल

सर्व्हे पूर्ण 50 जणांची उमेदवारी पक्की

महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने तीन ते चार सर्व्हे केल्याचे सांगितले जात आहे.त्या सर्व्हेचे निष्कर्ष आणि संभाव्य निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या प्रभाग निहाय याद्या यापूर्वीच तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये

40 ते 50 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याचा देखील बोलले जात आहे.तर दुसरी यादी देखील तयार करण्यात आल्याची चर्चा आहे.

15 डिसेंबरला निर्णय होणार

पुणे भाजपची यादी वरिष्ठांच्या समोर मांडण्यात देखील आलेले आहेत. बहुतांश प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या याद्या पक्षाकडून जवळपास फायनल करण्यात आल्या असून 15 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौरावर येणार आहे. त्यामध्ये या याद्या त्यांच्यासमोर मांडून यावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील आहे.

इच्छुक चिंतेत

इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याने आपल्याच उमेदवारी मिळेल, असा अनेक जणांना आत्मविश्वास आहे. मात्र, आधीच उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाल्याने इच्छुक चिंतेत आहेत. काही जण वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून आपली उमेदवारी निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, काही जण संघाच्या नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीसाठी फिल्डिंग करत आहेत.

Pune BJP
Amit Shah Vs Devendra Fadnavis : अमित शाहांचा 'डबल गेम'; देवेंद्र फडणवीसांना रोखण्यासाठी एकनाथ शिंदेंना ताकद, खासदाराचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com