Maharashtra Politic's : सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महायुती सरकारमध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांचा समावेश झालेला आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद भुजबळांना मिळण्याची शक्यता आहे. सरकारमध्ये सामील होण्याचा किस्सा खुद्द भुजबळ यांनी सांगितला असून मंत्रिमंडळातील समावेशासाठी कोणी प्रयत्न केले, हे मंत्रिपदी आरुढ झाल्यानंतरच्या पहिल्याच सत्कार समारंभात सांगून टाकले.
महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर छगन भुजबळ यांचा सत्कार करण्यात आला. त्या समारंभात भुजबळ म्हणाले, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे आभार मानतो. कारण त्यांनीसुद्धा आता नाही तर ज्या वेळी नागपूरमध्ये पहिल्यांदा शथविधी सोहळा झाला, त्या दिवशीसुद्धा फडणवीस यांचा माझ्या मंत्रिपदासाठी प्रचंड आग्रह होता. भुजबळांना आपल्याला मंत्रिमंडळात घ्यायलाच पाहिजे, असे त्यांना वगळू नका, असे ते सांगत होते. दुर्दैवाने त्या वेळी झालं नाही.
मंत्रिमंडळात माझा समावेश झाला नाही, त्यावेळी दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) या दोघांनीही आश्चर्य व्यक्त केले. हे कोणी केलं? काय झालं. अगदी मालेगावला अमित शाह आल्यानंतरही माझं नाव नसताना मला त्यांनी बाजूला बसवलं होतं. मोदी आणि शाह यांनीही प्रेम, आपुलकी आणि सबुरीचा सल्ला दिला होता, अशी आठवणही भुजबळ यांनी सांगितली.
आपण शांततेत जाऊ, सगळं काही बरोबर होईल, असे शाह यांनी मालेगावला आल्यानंतर सांगितले हेाते. त्यामुळे मी त्यांचाही आभारी आहे. त्यांनीसुद्धा सांगितले की ‘घ्या ह्यांना’. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांचाही माझ्या मंत्रिमंडळातील समावेशासाठी आग्रह होता, असेही भुजबळ यांनी अप्रत्यक्ष सांगितले.
विशेष म्हणजे मी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचाही फोन आला होता. त्यांनी सांगितलं की चांगलं झालं, उत्तम झालं आणि शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरेही आमचेच. माझ्या आयुष्यात दोन मोठे नेते मला मिळाले. एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार. एकाने लढावं कसं हे शिकवलं तर दुसऱ्यांनी समाजसेवा कशी करावे, हे शिकवलं. त्यामुळे मी सगळ्यांचा आभारी आहे, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.