Chhagan Bhujbal Latest News
Chhagan Bhujbal Latest News Sarkarnama
मुंबई

छगन भुजबळांच्या वाढदिवसाचा 'अमृत महोत्सव' सोहळा 'या' दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडणार

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादीचे (NCP) ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या ७५ व्या वाढदिवसाचा 'अमृत महोत्सव' सोहळा देशातील आणि राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हा सोहळा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे, असे समजते. (Chhagan Bhujbal Latest News)

छगन भुजबळ यांच्या या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशातील आणि राज्यातील विविध पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, जेष्ट लेखक-कवी डॉ. जावेद अख्तर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह देशभरातील अनेक नेतेमंडळी तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, साहित्य यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

छगन भुजबळ गौरव समितीमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार कपिल पाटील, आमदार सचिन आहिर यांचा समावेश आहे.

दरम्यान, छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्षाचे महत्वाचे नेते असून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली आहेत असून त्यांनी राज्याचं उपमुख्यमंत्री पद देखील त्यांनी भुषवलं आहे. मात्र, त्यांच्या राजकारणाची सुरूवात ही शिवसेनेतून झाली होती.

भुजबळ हे मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक सामान्य कुटूंबातील तरुण होते. ते बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकूण भारावून गेले होते. त्याची आई देखील याच मार्केटमधल्या एका छोट्याशा दुकानात फळं विकत होत्या. दरम्यानच्या काळात त्यांनी हा आपला कौटुंबिक व्यवसाय सोडून त्यानी राजकारणात उडी मारली.

त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर ते मुंबई पालिकेचे महापोैर देखील झाले. यानंतर त्यांनी शिवसेमध्ये महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. यानंतर मात्र त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा प्रवास राष्ट्रवादीमधून सुरू आहे. यंदा त्यांनी आपल्या वयाची पंचाहत्तरी गाठली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT