Param Bir Singh  Sarkarnama
मुंबई

परमबीरसिंहांचा पाय खोलात; खंडणी उकळण्यासाठी 'छोटा शकील'चा वापर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांना निलंबित करण्यात आले आहे. आता त्यांचा पाय खोलात गेला आहे. एका बिल्डरकडून खंडणी उकळण्यासाठी त्यांनी गँगस्टर छोटा शकीलच्या नावाचा वापर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

परमबीरसिंग यांच्यावर दाखल झालेल्या खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) करीत आहे. आता सीआयडीच्या हाती या प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर आहे. श्यामसुंदर अग्रवाल याने छोटा शकीलद्वारे धमकी दिल्याचा आरोप विकसक संजय पुनमिया याने केला होता. मात्र, तपासात हे कॉल श्यामसुंदला अडकवण्यासाठी पुनामियाने हॅकरच्या मदतीने स्वत:च्याच कार्यालयातूनच केल्याचे समोर आले आहे. हा सर्व कट परमबीरसिंह याच्या सांगण्यानुसारच रचला गेल्याचा खुलासाही हॅकरने चौकशीत केला आहे. विशेष म्हणजे, छोटा शकीलचा आवाज आणि फोनचे लोकेशन पाकिस्तानामधील कराची दाखवण्यासाठी पुनामियाने विशेष सॉफ्टवेअर आणि व्हीपीएनचा वापर केला होता. या प्रकरणी सीआयडी आणखी तपास करत असून लवकरच आरोपपत्रही दाखल करणार आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) परमबीरसिंह यांना नुकतेच फैलावर घेतले होते. परमबीरसिंह यांच्या विरोधातील खंडणीचा गुन्हा रद्द करावा, या प्रकरणी दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. हे अतिशय अस्वस्थ करणारे आहे. पोलीस दलाचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचा त्याच दलावर विश्वास नसेल, तर आम्ही काय म्हणायचे, असे न्यायालयाने म्हटवे होते. दरम्यान, परमबीरसिंह हे 25 नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी त्यांची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी सात तासांहून अधिक काळ चौकशी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांची चौकशी करण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्यांची गोरेगावमधील खंडणी प्रकरणात चौकशी करुन जबाब नोंदवला होता. आता याच प्रकरणात त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

पोलिस महासंचालकांकडून पाठवण्यात आलेला निलंबनाचा आदेश स्वीकारण्यास परमबीरसिंह यांनी दिला नकार होता. त्यांनी सेवाज्येष्ठतेचा मुद्दा उपस्थित केला होता. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचा अधिकारीच आपल्या निलंबनाचा आदेश देऊ शकतो, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनू श्रीवास्तव आजारपणाच्या रजेवर आहेत. त्यामुळे निलंबनाचे पत्र हे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडून देण्यात आले होते. निलंबनाचा आदेश स्वीकारण्यावरून बाणेदारपणा दाखवणारे परमबीरसिंह नंतर काही तासांतच नमले. त्यांनी अखेर निलंबनाचा आदेश स्वीकारला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT