Sunetra Pawar DCM Oath Ceremony  Sarkarnama
मुंबई

Fadnavis on DCM Sunetra Pawar : प्रसंग कठीण होता...म्हणत देवेंद्र फडणवीसांनी केले सुनेत्रा पवारांच्या धाडसाचे कौतुक

Devendra Fadnavis Statement : अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे झालेले दु:ख बाजूला ठेवून सुनेत्रा पवार यांनी राज्यासाठी पुढे येऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली; त्यांचा धाडसाचे फडणवीस यांनी कौतुक केले आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 31 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही सुनेत्रा पवार यांनी पक्षासाठी आणि राज्यासाठी पुढे येत उपमुख्यमंत्री होण्याचा निर्णय घेतला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. सुनेत्रा पवारांच्या या धाडसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. पत्नीच्या मृत्यूनंतरही सुनेत्रा पवारांनी दाखवलेल्या धाडसाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केल आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, प्रसंग कठीण होता...पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.

शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही...पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजप आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत, असे अभिवचन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दिले आहे.

मोदी काय म्हणाले?

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणाऱ्या सुनेत्रा पवारजी यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की, त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT