Sunetra Pawar : भावानंतर बहिणीला मिळाले राज्यातील दुसरे सर्वोच्च पद...

Dr. Padmasinh Patil News : सुनेत्रा अजित पवार यांनी आज महाराष्ट्राची उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्यातील पहिली महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत आणि सुनेत्रा पवार यांचे बंधू पद्मसिंह पाटील यांनी मंत्रिमंडळात गृहमंत्रिपदी म्हणून काम केले आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेतील दुसरे सर्वोच्च पद मिळविणारे पाटील बहीण-भाऊ पहिलेच ठरले आहेत.
padmasinh patil-sunetra pawar
padmasinh patil-sunetra pawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 31 January : राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (ता. 31 जानेवारी) शपथ घेतली. त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार ह्या भावानंतर राज्यातील सर्वोच्च दुसरे पद मिळविणारी बहीण ठरल्या आहेत. सुनेत्रा पवार यांचे बंधू डॉ पद्मसिंह पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील दुसरे पद मिळविणारे हे बहीण-भाऊ ठरले आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी (ता. २८ जानेवारी) विमान अपघातात बारामतीजवळ मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव पुढे आले.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात यावे, अशी मागणी पहिल्यांदा केली. त्यानंतर वेगाने सुत्रे फिरली आणि शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. अजितदादानंतर (Ajit Pawar) पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आल्याने उपमुख्यमंत्रिपदी काम करणारे पहिले पती-पत्नी ते ठरले आहेत.

सुनेत्रा पवार यांना जशा सासरी राजकारणाचा वारसा आहे, त्याच पद्धतीने त्यांना माहेरकडून राजकारणाचा मोठा वारसा आहे. सुनेत्रा पवार यांचे बंधू धाराशिवचे बडे नेते डॉ पद्मसिंह बाजीराव पाटील यांनीही राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे काम केले आहे. पाटील यांनी पाटबंधारे, ऊर्जा, उत्पादन शुल्क, गृह आदी पदांवर काम केले आहे.

padmasinh patil-sunetra pawar
Solapur BJP : महापौरपदाच्या ‘रेस’मधील नरेंद्र काळेंची भाजपकडून गटनेतेपदी बोळवण....

राज्याच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्रिपद हे मुख्यमंत्र्यांनंतर दुसऱ्या क्रमांकाचे पद मानले जाते. त्या गृहमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांचे बंधू पद्मसिंह पाटील यांनी काम केलेले आहे. तसेच, आता मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्रिपद हे दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे, त्यामुळे राज्यातील दुसरे सर्वोच्च पद मिळविणारे पहिले बहीण-भाऊ ठरण्याचा मान सुनेत्रा पवार आणि पद्मसिंह पाटील यांना मिळाला आहे.

padmasinh patil-sunetra pawar
NCP SP MLA Upsate : शपथविधीबाबत पवारांचा आमदार नाराज; म्हणाले, पवारसाहेबांना डावलून निर्णय...’

अजित पवार यांनी सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. मुख्यमंत्रिपदानंतर पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून दमदारपणे काम केलेले आहे. अजितदादानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री झालेले पवार दांपत्य पहिले ठरले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com