Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : 'इंडिया' आघाडी आणि 'महायुती'ची बैठक; मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या पराभवासाठी देशपातळीवरील विरोधी पक्षांनी एकत्रित मोट बांधत 'इंडिया' आघाडीची घोषणा केली आहे. या आघाडीची पाटणा, बेंगळूरु येथील बैठकीनंतर तिसरी बैठक 31 आणि 1 सप्टेंबरला मुंबईत होत आहे. परंतू, याचदिवशी राज्यातील 'एनडीए' युतीची देखील मुंबईत बैठक होणार आहे. याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बैठक बोलावल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी नेते , उपनेते, सचिव यांची बोलावली तातडीची बैठक बोलावली आहे. महायुतीची महत्त्वाची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक पार पडणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्यावर जबाबदारी दिली जाणार आहे. त्याचसोबत मतदारसंघातील काही प्रश्न असतील. या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. या महत्वाच्या बैठकीसाठी उपनेते यांच्या वेगवेगळ्या टीम बनवून त्यांच्यावर जबाबदारी देण्यात येणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप विरोधकांच्या ‘इंडिया’आघाडीची राष्ट्रीय पातळीवरील तिसरी बैठक होणार आहे. त्याच गुरुवार व शुक्रवारी अशा दोन्ही दिवशी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार(Ajit Pawar) गटाच्या महायुतीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत महायुतीच्या वतीने राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार आहे.

इंडिया आघाडी(INDIA)ची मुंबईतील बैठक गुरुवार आणि शुक्रवारी‘ग्रँड हयात’हॉटेलमध्ये होत आहे. तर महायुतीची बैठक वरळीच्या डोम सभागृहात होणार आहे. यामुळेच मुंबईत इंडिया विरुद्ध महायुती असे बैठकांचे सत्र रंगणार आहे. तर 'इंडिया'च्या बैठकीला शह देण्याकरिताच भाजपने ही रणनीती आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच इंडियाच्या बैठकीला एकतर्फी प्रसिद्धी मिळू नये आणि बैठकीवरून लक्ष विचलित करण्याकरिता महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुतीच्या बैठकीची घोषणा पत्रकार परिषदेत केली. या बैठकीत राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, तिन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व काही ठराविक नेतेमंडळींना निमंत्रण देण्यात आले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT