Mamata Banerjee News : 'ही आहे 'इंडिया'ची ताकद' ; सिलिंडरचे दर कमी होताच बॅनर्जींचा हल्लाबोल : केजरीवालांचेही समर्थन

Arvind Kejriwal News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शेलक्या शब्दांत भाजपवर हल्लाबोल केला.
Mamata Banerjee News
Mamata Banerjee NewsSarkarnama

Central Government News : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शेलक्या शब्दांत भाजपवर (BJP) हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी ट्वीट करत सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, "गेल्या दोन महिन्यांत 'इंडिया' आघाडीच्या फक्त दोनच बैठका झाल्या आणि आज आपण पाहतोय की एलपीजी गॅसची किंमत 200 रुपयाने कमी झाली आहे. ही आहे इंडियाची ताकद !'' ममता बॅनर्जी यांची ही पोस्ट दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीही शेअर केली आहे.

Mamata Banerjee News
Mallikarjun Kharge News ''जब वोट लगे घटने, तो चुनावी तोहफ़े लगे बटने'' : खर्गेंनी ठेवले भाजपच्या वर्मावर बोट

विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीमध्ये 26 राजकीय पक्षांचा समावेश आहे. या आघाडीची पहिली बैठक पाटणा येथे झाली होती. तर दुसरी बैठक बैंगलुरू येथे झाली होती. तर तिसरी बैठक गुरुवारी (31 ऑगस्ट) आणि शुक्रवारी (1 सप्टेंबर) मुंबईमध्ये होणार आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.

Mamata Banerjee News
Congress News : 'पराभवाच्या धास्तीने मोदी सरकारला महागाईची जाणीव ; गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्याने जनता फसणार नाही'

ममता बॅनर्जी यांची पोस्ट केजरीवाल यांनी शेअर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबईत होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीआधी विरोधी पक्षांमध्ये एकी असल्याचे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com