Eknath Shinde Ayodhya Tour
Eknath Shinde Ayodhya Tour  Sarkarnama
मुंबई

Ayodhya Tour : सुरत मार्गे गुवाहाटी ते आता अयोध्या दौरा; शिंदेंच्या सोबतीला फडणवीसांचे 'हे' दोन खास शिलेदार

सरकारनामा ब्यूरो

Shinde & Fadnavis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. अयोध्येत शिंदे हे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या सोबत त्यांचे समर्थक आमदार देखील आहेत. तर शुक्रवारी शेकडो शिवसैनिक रेल्वेने अयोध्येसाठी रवाना झालेले आहेत.

अयोध्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेटही घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच अयौध्या दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असे असतानाच या अयोध्या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदेंसोबत देवेंद्र फडणवीसांचे दोन अत्यंत विश्वासू शिलेदारही रवाना झाले आहेत. एवढंच नव्हे तर ज्यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे बंड करत सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी देखील फडणवीसांचे हे दोन शिलेदार शिंदेंच्या सोबतीला असल्याचे पाहायला मिळाले होते.

त्यानंतर आता देखील मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर जात असताना त्यांच्या बरोबर आमदार संजय कुटे आणि भाजप नेते मोहीत कंबोज हे अयोध्येला रवाना झाले आहेत. त्यामुळे गुवाहाटीपासून ते आता अयोध्या दौऱ्यापर्यंत फडणवीसांचे हे दोन शिलेदार शिंदेंच्या सोबतीला असल्यामुळे आश्वर्य व्यक्त करण्यात येत आहे.

'असा' असणार अय़ोध्या दौरा...

मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या अयोध्या दौऱ्यात प्रभू श्रीरामाची महाआरती, पूजा, त्यानंतर ते नवीन राम मंदिरांच्या बांधकामाला भेट देणार आहे. याशिवाय ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही भेटणार आहेत.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT