Eknath Shinde Ayodhya Tour : मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात फडणवीसांचे 'हे' दोन खास शिलेदार सोबत असणार...

Shinde & Fadnavis : शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी...
Eknath Shinde and Devendra Fadnavis
Eknath Shinde and Devendra FadnavisSarkarnama

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. येथे एकनाथ शिंदे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यात एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत. मागील वर्षी राज्यातील सत्तांतर आणि मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शिंदे अयौध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र,या अयोध्या दौऱ्यात फडणवीसाचे दोन अत्यंत विश्वासू शिलेदारही सोबत असणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) 9 एप्रिल रोजी अयोध्या दौरा करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या दौऱ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत मंत्री, आमदार, पदाधिकारी असा सर्व गोतावळा अयोध्येला जाणार आहे. कार्यकर्त्यांना अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनही बुक करण्यात आल्या आहेत. तसेच 7 आणि 8 एप्रिल रोजी लखनौ ते अयोध्येपर्यंत शिंदेंच्या स्वागतासाठी सुमारे 1500 बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात येणार असल्याची माहितीही खासदरा हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
Aditya Thackeray Challenge : ठाण्यात येऊन जिंकून दाखवणार : आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान..

आगामी काळात लोकसभा, विधानसभेसह,मुंबई, पुण्यासह राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. यात हिंदुत्व आणि राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. कारण राममंदिर हा कायम भाजपच, शिवसेनेचा पहिल्यापासून कळीचा मुद्दा राहिला आहे. महाराष्ट्रात असो की देशात त्यांनी कायम या मुद्द्यावर राजकारण केलंय.

तसेच यापूर्वी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा चांगलाच राज्याच्या राजकारणाच मोठा चर्चेचा विषय ठरला होता. आणि महत्वाचं म्हणजे शिंदे यांनी देखील उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देताना हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता. त्यामुळे त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विशेष महत्व आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis
BJP News : कढी पत्यासारखं भाजप त्यांना बाहेर फेकणार..; अनिल अँटनींच्या BJP प्रवेशावर लहान भाऊ संतप्त

'असा' असणार अय़ोध्या दौरा...

मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या अयोध्या दौऱ्यात रामाची महाआरती, पूजा, नवीन राम मंदिरांच्या बांधकामाला भेट देणार आहे. याशिवाय ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही भेटणार आहेत. राममंदिर हा कायम भाजपचाच मुद्दा होता. महाराष्ट्रात असो की देशात त्यांनी कायम या मुद्द्यावर राजकारण केलंय.

फडणवीसांचे 'हे' दोन शिलेदार असणार सोबत..

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत विश्वासू आणि संकटमोचक म्हणून गिरीश महाजन ओळखले जातात. ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारही जाणार मुख्यमंत्री शिंदेंसोबत अयोध्येला जाणार आहे.यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कारण महाजन आणि फडणवीसांचं सख्य सगळ्यांचं माहिती आहे. याबाबत महाजन म्हणाले, अयोध्येला राममंदिर आहे आणि दर्शनाला जाणार आहोत. परवा कॅबिनेट झाल्यावर ते म्हणाले तुम्हीही चला म्हणून जात आहे.

दोन्ही तरुण नेते भाजपच्या नेतृत्वाच्या जवळ...

योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेतच पण भाजपच्या वरच्या फळीतले नेते मानले जातात, भविष्यत भाजपचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. तिकडे यूपीचे योगी आणि महाराष्ट्राचे फडणवीस असे दोन्ही तरुण नेते भाजपच्या नेतृत्वाच्या जवळ आहे आणि भविष्यातला पर्याय आहे. आणि याच योगींना एकटे शिंदे भेटणार होते. पण आता त्यांच्यासोबत भाजपचे २ नेते असणार आहेत.

अयोध्या दौऱ्याचा टिझर चर्चेत...

शिवसेना ( शिंदे गट ) प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अयोध्या दौऱ्याआधी एक टिझर ट्विट केला आहे. यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत आनंद दिघे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बॅनरवर दिसत आहेत. तसेच, प्रभू श्री रामाचे अयोध्येतील नवीन मंदिरही दाखवण्यात आलं आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com