Eknath Shinde's Flight take off for Lucknow : राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ एप्रिल रोजी प्रथमच अयोध्या दौरा होत आहेत. त्यासाठी ते मुंबई विमानतळावरून सायंकाळी सहा वाजता विमानाने लखनौसाठी रवाना झाले. त्यांच्यासोबत शिवसेनेतील सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह भाजपचे काही आमदारही होते. दरम्यान यापूर्वीच मंत्री दीपक केसरकर आणि उदय सामंत आयोध्येत पोहचले आहेत.
आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) लखनौ येथे मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या सकाळी ते लखनौहून अयोध्येकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या आयोध्या दौऱ्याची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. अयोध्यानगरी मुख्यमंत्री शिंदेच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे.
लखनौ ते अयोध्या या दरम्यान सुमारे दीड हजार बॅनर आणि पोस्टर लावण्यात येणार आहेत. अयोध्या शहरातील रस्त्यांवर शिवसेनेचे झेंडे भगवे झेंडे फडकत आहेत. त्यावर धनुष्यबाण हे चिन्ह दिसून येत आहे. शहरात ठिकठिकाणी बॅनर, होर्डींग, पोस्टर्स लावलेले आहेत.
त्यावर मुख्यंमत्री शिंदे यांचा भगवाधारी असा उल्लेख केलेला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचेही फोटो झळकत आहेत. शरयू नदी किनारी मुख्यमंत्री आरती करणार आहेत. त्या ठिकाणाही स्टेज बनविण्यात आला आहे.
'असा' असणार मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (ता. ८) अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. शनिवारी रात्री ते लखनौ येथे मुक्काम करतील. लखनौहून रविवारी (ता. ९) मुख्यमंत्री अयोध्येला हेलिकॉप्टरने जातील. तेथे ते प्रभू राम मंदिरातील महाआरतीमध्ये सहभागी होणार आहेत.
महाआरतीनंतर मुख्यमंत्री राममंदिराच्या बांधकामाला भेट देतील. त्यानंतर ते लक्ष्मण किल्ल्याला भेट देतील. तेथील संत-महंतांचे आशीर्वाद घेतील. किल्ल्याला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शरयू नदीवर आरती करणार आहेत. या कार्यक्रमांनंतर रात्री उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानी जेवण करतील. त्याच दिवशी मध्यरात्री शिंदे मुख्यमंत्री मुंबईला रवाना होणार आहेत.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.