Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde: 'माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या, दाढीवर हात फिरवला की...'; मुख्यमंत्री शिंदेंचा रोख कुणाकडे ?

Shivsena : 'घर तिथे शिवसेना अन् गाव तिथे शिवसेना', एकनाथ शिंदेंची विरारमध्ये घोषणा

संदीप पंडित

Vasai-Virar News: लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवरच सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या अनुषंगानेच आज शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा विरारमध्ये पार पडला.

यावेळी कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'घर तिथे शिवसेना अन् गाव तिथे शिवसेना' हा मंत्र देत कामाला लागण्याचे निर्देश दिले. यावेळी बोलताना 'माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या, दाढीवर हात फिरवला की, विरोधकांची धास्ती वाढते', असा चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला.

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच वसई विरारमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. नुकतीच शिवसेनेला मान्यता मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह जोरात होता. या मेळाव्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जागतिक मराठी संमेलनात केलेले भाषण देखील चर्चेचा विषय ठरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पालघरमध्ये झालेल्या साधू हत्याकांडातील मयत साधूंच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्यावतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच यावेळी शिवसेनेच्या मेळाव्यात या साधूंच्या कुटुंबीयांची मुखमंत्र्यांनी भेट घेत त्यांचा सन्मान केला. या मेळाव्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी विरारमध्ये आयोजित जागतिक मराठी संमेलनाला हजेरी लावली.

यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. 'माझ्या दाढीत अनेकांच्या नाड्या आहेत, दाढीवर हात फिरवला की अनेकांना धास्ती वाटते',अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकाना चिमटा काढला.

दरम्यान, मराठी संमेलनात एकेकाळचे कट्टर विरोधक असलेल्या 'बविआ'चे आमदार हितेंद्र ठाकूर यांची त्यांची केलेली स्तुती आणि आप्पा पालघरच्या विकासाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही, हे आश्वासन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्याने बरेच काही सांगून गेल्याचे दिसून आले.

(Edited By- Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT