Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Savarkar Controversy : आपल्या देशाची परदेशात जाऊन निंदा करणं हा देशद्रोहच; शिंदेंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Rahul Gandhi : ''अंदमानच्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस राहून यावं..''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला.

रविवारी मालेगावच्या सभेत बेलताना उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहे, सावकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा राहुल गांधींना दिला होता. याच मुद्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, ''स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान राहुल गांधी करत आहेत. त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. आम्ही राज्यभरात 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा' काढणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. सावरकर होते त्या अंदमानच्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस राहून यावं, मग त्यांना कळेल की त्याग काय असतो'', असं ते म्हणाले.

''काही लोकं हिंदुत्व-हिंदुत्व म्हणतात. मात्र, राहुल गांधी जे सावरकरांबाबत बोलतात. त्यावर ते काहीच बोलत नाहीत. कालच्या सभेत ते म्हणाले की सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, पण त्यांनी हे सांगावं की मग तुम्ही काय करणार आहात? राहुल गांधीच्या थोबाडीत देण्याची हिंमत तुमच्यात आहे का?'', असा सवाल नाव न घेता उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांनी केला.

दरम्यान, राहुल गांधी हे परदेशात जाऊन आपल्या देशाची निंदा करता, यापेक्षा मोठं या देशाचं दुसरं दुर्दैव काय असू शकतं. तुम्ही देशाची लोकशाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी परदेशात जाऊन बोलत आहात. मात्रं, आपल्या देशाची निंदा परदेशात जाऊन करणं, याचीही निंदा करावी तेवढी कमी आहे. खऱ्या अर्थाने हा देशद्रोहच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT