Eknath Shinde-Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राज ठाकरे यांची भेट

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि शिंदे गट मिळून शिवसेनेपुढे कडवे आव्हान उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ही शिंदे-ठाकरे भेट महत्वाची मानली जात आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज (ता. १ सप्टेंब) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी ‘शिवतीर्थ’वर जाणार आहेत. राज ठाकरे यांच्या घरातील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री जाणार असले तरी त्या ठिकाणी राजकीय चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि शिंदे गट मिळून शिवसेनेपुढे कडवे आव्हान उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे ही शिंदे-ठाकरे भेट महत्वाची मानली जात आहे. (Chief Minister Eknath Shinde will meet Raj Thackeray)

मुख्यमंत्री शिंदे हे आज दुपारी साडेचारच्या सुमारास राज ठाकरे यांच्या घरातील गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या घरी दिलेल्या भेटी आणि आज खुद्द मुख्यमंत्री जाणार असल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा चर्चिल्या जात आहेत. मुख्यमंत्री गणपतीचे दर्शन घेणार असले तरी त्या ठिकाणी मुंबई महापालिका निवडणुकीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजप, मनसे आणि शिंदे गट यांचा राजकीय प्रतिस्पर्धी समान असून भाजपची मुंबई महापालिका जिंकण्याची इच्छा आता लपून राहिलेले नाही. मुंबईत आपलाच महापौर बसविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यासाठी पदाधिकारी निवडीपासून पहिल्याच टप्प्यात मुंबईला एक कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलेले आहे. याशिवाय आशिष शेलार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याकडे मुंबई भाजपची धुरा सोपविण्यात आलेली आहे. त्यांच्या काळात मागील निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ८० पेक्षा अधिक नगरसेवक निवडणून आणले होते. त्यामुळे शेलार यांच्याकडेच मुंबई अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आलेली आहे.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीव भाजप, शिंदे गट आणि मनसेची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त हेात आहे. त्यामुळे आजच्या भेटीत या विषयावर चर्चा होते आणि मुख्यमंत्री शिंदे हे ते सांगतील का, याकडे मुंबईकरांचे डोळे लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT