Mumbai : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच पहिल्यांदाच दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन'मध्ये राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप - शिवसेनेच्या मंत्री, आमदारांसह सावरकरांना अभिवादन करण्यात आले. याचवेळी सावरकरांच्या जयंतीचं औचित्य साधत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी गौरवोद्गार काढले. तसेच वांद्रे-वर्सोवा सी लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्रसेतू' असं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम करुन शौर्य दाखवणारे किंवा संकटातून लोकांची मुक्तता करणाऱ्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता' पुरस्कार देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते दिल्लीतल्या नवीन संसद इमारतीचं लोकार्पण रविवारी( दि.२८) करण्यात आले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावरकर जयंतीनिमित्त दोन मोठ्या निर्णयाची घोषणा केली. मुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची जयंती निमित्त राज्य सरकारकडून सावरकर गौरव दिन साजरा उत्साहात करण्यात आला आहे.
तसेच राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आले आहेत. पण सावरकरांचं आणि समुद्राचं नातं आहे. त्यामुळे वांद्रे-वर्सोवा सी लिंकला 'स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्रसेतू' असं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विविध क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय काम करुन शौर्य दाखवणारं किंवा संकटातून लोकांची मुक्तता करणाऱ्यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर वीरता' पुरस्कार देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सदनात प्रथमच सावरकरांची जयंती...
महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan)प्रथमच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, तसेच भाजप व शिवसेनेचे खासदार उपस्थित होते. त्यावेळी बोलताना संसद भवनाच्या उदघाटन कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना शिंदे यांनी खडे बोल सुनावले.
मुख्यमंत्री म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीचे औचित्य साधून केलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमावर वेगवेगळ्या पद्धतीने आक्षेप घेतात, हे दुर्दैवी आहे. घराणेशाहीमध्ये अडकलेल्या पक्षांना देशाचे कल्याण, संस्कृती, हिंदुत्वाद आणि सावरकर यांचं वावडं आहे, असं आज पहायला मिळतंय. काही लोकांनी अशा मंगलमय सोहळ्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण, संपूर्ण देशातील १४० कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.