CM Shinde News : एप्रिलमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे, तयारीला लागा. अशी सूचना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित महायुतीच्या बैठकीत केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिन्ही पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार आणि महायुतीमधील नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जोमाने काम करा, पंतप्रधान मोदींना पुन्हा जिंकून आणायचं आहे. सर्व लोकसभा मतदारसंघात मोर्चेबांधणी करायला सुरुवात करा. असं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. तर तिन्ही पक्षात एकजुट ठेवा, समन्वय राखा, एकमेकांवर टीका-टिप्पणी टाळा. सत्तेत राहून सरकारविरोधात कुठलीही भूमिका घेऊ नका, असे उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.
याशिवाय आरक्षणाबरोबरच आगामी निवडणुकीसाठीही कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मराठा आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोहचवा असेही सांगण्यात आले.
याचबरोबर अजित पवार गटाकडून मराठा आरक्षणाच्या मुद्य्यावरून आक्रमक भूमिका घेत मंत्रालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवल्याची माहिती समोर आली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.