CM Yogi Adityanath Sarkarnama
मुंबई

CM Yogi Adityanath : '...तेव्हा POK भारताचा भाग असेल' ; मुख्यमंत्री योगींचं जाहीर सभेत मोठं विधान!

सरकारनामा ब्यूरो

Loksabha Election 2024 : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निमित्त सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेत्यांनी प्रचारसभांचा धडका लावला आहे. दरम्यान सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून वारंवार असा दावा केला जात आहे की, पीओके अर्था पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होणार आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर पालघरमधील एका सभेला संबोधित करताना पीओके भारताच भाग कधी होईल, हेदेखील सांगून टाकले. योगी जनतेला उद्देशून म्हणाले, तुम्ही बघा नरेंद्र मोदी(Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्याच्या पुढील सहा महिन्यांच्या आत, पाकव्याप्त काश्मीर हा भारतचा भाग असेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री योगी(CM Yogi) असंही म्हणाले की, आम्ही आपल्या शत्रूंची पूजा थोडीच करणार आहोत. कोणी जर आमच्या लोकांना मारलं तर आम्ही त्याची पूजा नाही, तर आम्हीही तेच करू जे त्यांच्याबरोबर व्हायला हवं. आता तर त्यांना पीओके वाचवणंही कठीण होत आहे. तुम्ही बघा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्याच्या पुढील सहा महिन्यांच्या आत पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर हा भारताचा हिस्सा असेल.

काँग्रेसवरही केली जोरदार टीका -

मुख्यमंत्री योगींनी या सभेत काँग्रेसवर(Congress) जोरदार टीका केली. त्यांनी प्रश्न विचारण्याच्या सुरात म्हटले की, देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते तेव्हा काय घडत होते? मुंबईत दहशतवादी हल्ले होत होते आणि लोक म्हणायाचे दहशतवादी सीमापारचे आहेत. अरे जर सीमापारचे आहेत तर तुमचं मिसाइल कशासाठी आहे?

योगी म्हणाले ज्याप्रकारे पंतप्रधान मोदींनी एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद पूर्णपणे उध्वस्त केला आहे. तुम्हीतर हेही बघितलं असेल की ब्रिटनच्या एका मोठ्या वृत्तपत्राने हे लिहिले की, पाकिस्तानमध्ये मागील तीन वर्षांत जेवढे मोठे कुख्यात गुन्हेगार होते ते एक-एक मारले गेले आणि त्यांना मारणाऱ्यांमध्ये भारतीय यंत्रणांचा हात आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT