Chitra Wagh - Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh criticism Uddhav Thackeray : ‘’उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला..’’ ; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!

BJP vs Shiv Sena UBT :उद्धव ठाकरेंनी भाजपच्या ‘सौगात-ए –मोदी’ या उपक्रमावर टीका केली होती ; जाणून घ्या, चित्रा वाघ आणखई काय म्हणाल्या आहेत?

Mayur Ratnaparkhe

Chitra Wagh statement : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या ‘सौगात-ए –मोदी’ या उपक्रमावर टीका केली आहे. त्यानंतर आता भाजपने जोरदार पलटवार करणे सुरू केले आहे. भाजपचे नेते उद्धव ठाकरेंवर घणाघात करत आहेत. प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर आता भाजप आमदार चित्रा वाघ यांनीही उद्धव ठाकरेंच्या टीकेवर पलटवार केला आहे.

चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनी एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, ''उद्धवजी, तुम्ही त्या तुष्टीकरणाच्या राजकारणात इतके बरबटले आहात की तुम्हाला सावरकरांचाही विसर पडला. काय म्हणाले होते सावरकर, हिंदू म्हणजे कोण? तर हिंदू म्हणजे, सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या ह्या भरतभूमीस जो कोणी आपली पितृभू आणि मातृभू मानतो तो हिंदू.''

तसेच ''त्यामुळेच आम्ही दिवाळीला जसा आनंदाचा शिधा देतो तसंच पंतप्रधानांनी ‘सौगात-ए –मोदी’ दिलं तर ठाकरे घाबरले वाटतं? मी कायम म्हणते की आम्हाला हिंदुंत्वाचा सार्थ अभिमान आहे. हिंदूह्रदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे देखील म्हणाले होते की, गर्व से कहो हम हिंदू है, त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत पण तुमंच काय…?'' असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

तसेच ''उलेमा बोर्डाच्या १७ मागण्या मान्य करताना तुम्हाला हिंदुत्त्व आठवलं नाही? वक्फ बोर्डाच्या सुधारित बिला विरूध्द तुमचे नेते मतदान करतात तेव्हा कुठे गेलं होतं हिंदुत्त्व? या देशाच्या १४० कोटी जनतेला आपलं कुटुंब मानणाऱ्या वसुधैव कुटुंबकम् म्हणत जगणाऱ्या आणि साऱ्या जगाला प्रेरणा देणाऱ्या प्रधानमंत्री मोदीजींबद्दल(PM Modi) बोलण्याची तुमची कुवत नाही.'' असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

याशिवाय, ''तुम्ही आजही जातीवाद करण्यात मश्गुल आहात. देशाभिमान आणि राष्ट्राचं सन्मान याच्याशी तुमचं घेणंदेणं नाही आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचं देखील तुम्हाला सोयंर राहिलं नाही. त्यामुळे तुम्ही इफ्तार पार्टीची तयारी करा, त्यामध्ये औरंग्याचे गुणगाण गाणाऱ्यांवर टाळ्या वाजवा.'' अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर(Uddhav Thackeray) पलटवार केला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? -

''केंद्रातील सरकारचा सौगात-ए-मोदी नाही, तर हे सौगात-ए-सत्ता असा हा उपक्रम आहे. सत्तेसाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात,याचं एक हे निर्लज्य उदाहरण असल्याचे ठाकरे म्हणाले.ही सोगात ए सत्ता ही बिहारच्या निवडणुकीपुरती राहणार आहे की नंतर सुद्धा राहणार आहे,हे आधी भाजपनं जाहीर करावं'' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

तसेच ''राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं,त्यातून केवळ सत्ताधाऱ्यांच्या पाशवी बहुमताचा माज दिसला. अधिवेशन काळात देशाला,राज्याला चांगलं गाणं मिळालं. तेवढंच काय ते अधिवेशनाचं फलित म्हणावं लागेल.'' अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली होती.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT