Kunal Kamra latest update : शिवसेनेच्या टार्गेटवर आलेल्या कुणाल कामराचे ‘MNS’च्या बड्या नेत्याने मानले जाहीर आभार, म्हटले...

MNS leader thanks Kunal Kamra : जाणून घ्या, नेमकं कोणी व कशाबद्दल कुणाल कामराचे आभार मानले आहेत?
MNS leader thanks Kunal Kamra
MNS leader thanks Kunal Kamrasarkarnama
Published on
Updated on

Kunal Kamra controversy : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ज्या व्यक्तीमुळे तापलेलं आहे. शिवाय, ज्या व्यक्तीच्या विरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रचंड आक्रमक झालेली आहे आणि अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात गुन्हेही दाखल होत आहेत. तर विरोधी पक्ष प्रामुख्याने ठाकरे गटातील नेते ज्या व्यक्तीच्या समर्थनात उतरले आहेत, अशा त्या कॉमेडियन  कुणाल कामराचे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी आभार मानले आहेत.

कुणाल कामराने त्याच्या एक शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा उल्लेख न करता एक उपहासात्मक गाणं सादर केलं, ज्यानंतर शिंदे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. शिवाय, सत्ताधारी पक्षांमधील नेत्यांनीही कुणाल कामराच्या या कृतीचा निषेध व्यक्त केला. तर विरोधी पक्ष प्रामुख्याने ठाकरे गटाचे नेते मात्र कामराच्या पाठिशी उभा ठाकल्याचे दिसून येत आहे. शिवाय कुणाल कामारानेही या प्रकरणात माघार न घेण्याची भूमिका जाहीर केली असून, यामुळे एकुणचा राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.

MNS leader thanks Kunal Kamra
Salman Khan news : सततच्या जीवे मारण्याच्या धमक्यांना अखेर वैतागला सलमान; मौन सोडत पहिल्यांदाच उघडपणे, म्हणाला..

अशात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) कल्याण-डोंबिवली मतदारसंघातील माजी आमदार आणि नेते राजू पाटील यांनी कुणाल कामराचे आभार मानत असल्याचे त्यांच्या अधिकृत एक्स हॅण्डलवर पोस्ट टाकून जाहीर केले आहे.

राजू पाटील(Raju Patil) आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत, ‘’धन्यवाद, @kunalkamra88 , आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल! #बिल्डरांची_मेट्रॅा #MMRDA #MSRDC #टक्केवारी #kunal_kamra.’’ तसेच यासोबतच राजू पाटील यांनी कुणाल कामराचा नवीन व्हिडिओही पोस्ट केला आहे.

MNS leader thanks Kunal Kamra
Disha Salian case : ‘’खिशात भिजणारे राजीनामे आता तरी बाहेर काढा आणि ...’’ ; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ठाकरे पिता-पुत्रास चॅलेंज!

 खरंतर राजू पाटील यांनी कुणाल कामराचा हा व्हिडिओ पोस्ट करून सरकारवरही निशाणा साधला आहे. कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष जावे, असा त्यांचा यामागे उद्देश दिसत आहे. तर कुणाल कामराने मुंबईतील रस्त्यांच्या स्थितीवरून सरकारला घेरलंय. ‘हवाहवाई’ या गाण्याच्या चालीवरून कामराने मुंबई शहरातील रस्ते काँक्रिटकरणावरून सरकारवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com