Disha Salian case : ‘’खिशात भिजणारे राजीनामे आता तरी बाहेर काढा आणि ...’’ ; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं ठाकरे पिता-पुत्रास चॅलेंज!

Eknath Shinde Shivsena challenge to Uddhav Thackeray and Aditya Thackeray : जाणून घ्या, नेमकं कोणी काय म्हटलं आहे? ; सध्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे.
Eknath Shinde,Uddhav Thackeray and Aditya Thackeray
Eknath Shinde,Uddhav Thackeray and Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Disha Salian death : महाराष्ट्राचं राजकारण विविध मुद्य्यावंरून कायमच तापलेलं असतं. आता सध्या कॉमेडियन कुणाल कामराचा मुद्दा आहेत, तर त्याशिवाय दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरूनही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विशेष करून या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर कायम निशाणा साधत आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या(Shivsena) प्रवक्त्या आणि उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे की, ‘’कोणत्याही मंत्र्यांवर, आमदार - खासदारांवर आरोप झाले की वर तोंड करुन राजीनामा मागणारे टोमणे सम्राट… आता स्वत:वर आणि आपल्या कुपुत्रावर आरोप झाल्यावर मूग गिळून आहेत. थोडी तरी जनाची किंवा मनाची शिल्लक असेल ना तर खिशात भिजणारे राजीनामे आता तरी बाहेर काढा आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत पायउतार व्हा!!! बोला , आहे का हिम्मत?’’

Eknath Shinde,Uddhav Thackeray and Aditya Thackeray
Yogi Adityanath News : तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार का? ; मुख्यमंत्री योगींनी केलं मोठं विधान, म्हणाले...

तसेच या आधी शीतल म्हात्रे यांनी ‘’दिशा सालियनच्या बलात्काराचा आणि हत्येचा संशयित आरोपी. जो अवघ्या ६ हजार मतांनी आजोबांच्या पुण्याईवर निवडून येतो. तो एवढ्या माजोरड्या नजरेने स्वतःच्या हिंमतीवर सव्वा लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झालेल्या, महाराष्ट्रात ८० पैकी ६० आमदारांना निवडून आणणाऱ्या, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे पाहतोय. लायकी तरी आहे का??? त्यांच्या संघर्षावर बोट ठेवण्याएवढी...? शेवटी कसं आहे सगळंच वारशाने नाही मिळत...काही गोष्टी स्वतः कमवाव्या पण लागतात. आजोबा-पणजोबांच्या पुण्याईने मिळालेल्यांना ते कळायचं नाही...!!!’’ असंही म्हटलेलं होतं.

दरम्यान दिशा सालियानचा(Disha Salian) मृत्यू अपघातात झाला नसून तिच्यावर बलात्कार झाला आणि मग तिची हत्या केली गेली, असा गंभीर आरोप दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी केला असून, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय या प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी केली जावी अशीही त्यांची मागणी आहे.

Eknath Shinde,Uddhav Thackeray and Aditya Thackeray
Kangana Ranaut on Kunal Kamra : कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील टिप्पणीवर कंगना रनौतची 'रोखठोक' प्रतिक्रिया, म्हटले...

तर सालियान यांची बाजू मांडणारे त्यांचे वकील नीलेश ओझा यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार गंभीर आरोप केलेले आहेत. यावरूनच आता ठाकरे पिता-पुत्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या निशाण्यावर आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com