Chitra Wagh Vs Urfi Javed news update
Chitra Wagh Vs Urfi Javed news update sarkarnama
मुंबई

Chitra Wagh Vs Urfi Javed : चित्रा वाघांची महिला आयोगावर डरकाळी ; म्हणाल्या, 'भाषा नकोय ..'

सरकारनामा ब्युरो

Chitra Wagh : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांच्यातील वाद सध्या रंगला आहे. यावरुन दररोज आरोप-प्रत्यारोप समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. उर्फीच्या अंगप्रदर्शनावरुन चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

वाघ यांच्या टीकेला उर्फी प्रत्युत्तर देत आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली आहे. चित्रा वाघ यांनी आज (बुधवारी) समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी थेट महिला आयोगाला (womens commission) सुनावलं आहे.

“भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब ? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? महिला आयोगाची भाषा नकोय कृती हवी. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ? आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ?” असा सवाल चित्रा वाघ यांनी टि्वट करीत उपस्थित केला आहे.

या आधीच्या पोस्टमध्ये उर्फीने चित्रा वाघ आणि संजय राठोड यांच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. यात तिने चित्रा वाघ यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले.

"मी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर चित्रा वाघ आपण एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी नक्कीच बनू. चित्रा जी, तुम्हाला संजय राठोड आठवतात का ? तुम्ही भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांच्याशी घनिष्ठ मैत्री झाली आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका विसरलात. पण राष्ट्रवादीत असताना मात्र त्यांच्यावर अनेक आरोप केले होते," असा टोला उर्फीने चित्रा वाघ यांना हाणला आहे.

"भाषा नको तर कृती हवी..सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे हे राज्य महिला आयोग तिच्या या कृत्याचं समर्थन करतंय का?," असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यावर काय उत्तर देतात, हे लवकरच समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT