Chitra Wagh, Udhav Thackeray
Chitra Wagh, Udhav Thackeray sarkarnama
मुंबई

Chitra Wagh on Udhav Thackeray : उद्धवजी तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवीये…चित्रा वाघ यांची टीका

सरकारनामा ब्युरो़

Chitra Wagh News : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या व्टिटर अकाउंटवरून ट्विट करत त्यांनी 'उद्धवजी तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे. देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीने सपशेल लोटांगण घातलंय. कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता,' अशी सडेतोड टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर सडेतोड टीका केली आहे. या टीकेला भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना तुम्हाला मोदी सरकारची ॲलर्जी आहे का, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

चित्रा वाघ यांनी व्टिटमध्ये म्हटले की, देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीने सपशेल लोटांगण घातलं आहे. कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता. दिवंगत बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांनी स्वतंत्र बाण्याने पक्ष चालवला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात. त्यामुळेच स्वतःच्या कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण देशालाच आपला परिवार मानणाऱ्या मोदी सरकारची तुम्हाला ॲलर्जी झाली आहे. पण, उद्धवजी तुम्हाला ज्यांची ॲलर्जी आहे, त्याच्यावर देशातील 140 कोटी जनतेची फुल मर्जी आहे. त्यामुळे या वेळीही तुम्हाला सहन करावं लागेल. अब की बार, फिर से एकबार मोदी सरकार..!

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT