Chitra Wagh, Uddhav Thackeray News Sarkarnama
मुंबई

Chitra Wagh News : 'कोविड घोटाळ्यात कंत्राटे कोणी ओरबाडली; उद्धवजी... यावर कधी बोलाल?' चित्रा वाघांनी डिवचलं

Uddhav Thackeray News : चित्रा वाघ यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून निशाणा साधला.

सरकारनामा ब्यूरो

Chitra Wagh, Uddhav Thackeray News : पक्ष चालवण्यात अपयशी ठरल्याची भावना तुमच्या चेह-यावर होती आणि बघ कसा संपवला पक्ष म्हणत...सर्वज्ञानी संजय राऊत तुम्हाला वेडावत होते. सारे केविलवाणे चित्र...दोघांनीही मुलाखतीत आणलेले उसणे अवसान मात्र बेस्टच! अशा शब्दांत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवरून निशाणा साधला.

'सामना'चे संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीचा पहिला भाग आज (ता.२६ जुलै) प्रकाशीत झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच खडेबोल सुनावले. यावरुन चित्रा वाघ यांनी ठाकरेंवर पलटवार केला.

चित्रा वाघ यांनी ट्वीट करत ठाकरेंवर टीका केले. त्या म्हणाल्या, ''उद्धवजी तुमच्यात एक चांगला कलाकार दडलेला आहे. हे आम्ही जाणतो... पण त्याची झलक कुठे दिसली नाही राव. पण काही प्रश्नांची उत्तरे घ्यायची राहिली बघा... एखाद्या कणा असलेल्या पत्रकाराला मुलाखत दिली असती तर पोकळ बातांपेक्षा काही ठोस प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राच्या जनतेलाही मिळाली असती.''

''कोविड घोटाळ्यात कंत्राटे कोणी ओरबाडली, कोविड घोटाळ्यात खैरातीसारखी कंत्राटे कुणाला वाटली? पत्रा चाळीत मराठी माणसाला लुटणारे दरोडेखोरांना कोणी पाठीशी घातले? अलिबागचे 19 बंगले कुणाचे होते? हे प्रश्न अजून अनुत्तरितच आहेत. उद्धवजी... यावर कधी बोलाल?'' असे सवाल वाघ यांनी केले आहेत.

खरच खेकड्यांनी धरण फोडले... आणि तुम्हाला कळालंही नाही... तो खेकडा अजूनही तुमचे पाय खेचतोय... तोच खेकडा तुमची मुलाखत घेतोय... उद्धवराव..! असा टोला वाघ यांनी राऊतांना लगावला आहे. या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना ''वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेले होते'', असा प्रश्न विचारला होता. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, खेकड्यांनी धरण फोडले, असा खोचक टोला लगावला होता. त्यावरुन वाघ यांनी ठाकरेंना डिवचले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT