Uddhav Thackeray Interview :
Uddhav Thackeray Interview : Sarkarnama

Uddhav Thackeray Interview : 'शिवसेनेने खंजीर खुपसला तर राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं?' ठाकरेंचा भाजपला सवाल!

Uddhav Thackeray ON NCP Crisis : "जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक आहेत. सत्तेला चटावले की त्यांनी त्यापुढे काहीही दिसतच नाही. "

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून खासदार संजय राऊत यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा पहिला भाग आज (ता.२६) प्रसिद्ध करण्यात आला. या मुलाखतीत ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. "शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला असं म्हणून आम्ही शिवसेना फोडली म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसने काय खुपसलं म्हणून राष्ट्रवादी फोडली?" असा थेट प्रश्न त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला विचारला आहे.

Uddhav Thackeray Interview :
Shivsena Disqualification Case : ठाकरे गटाची अस्वस्थता वाढणार; शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर पडणार?

ठाकरे म्हणाले, “शिवसेना फोडण्याचं समर्थन करताना पाठित खंजीर खुपसला अस म्हणणारे आता राष्ट्रवादीने असं काय खुपसलं होतं की, तुम्ही राष्ट्रवादीही फोडली? शिवसेना फोडून ४० आमदार तिकडे घेतल्यानंतरही, सरकारमध्ये पुरेपुर संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी फोडण्याची गरज का भासली? बरं, राष्ट्रवादी फोडण्याच्या चार-पाच दिवसांआधी राष्ट्रवादीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपाचे काय झाले? त्या घोट्याळ्यातील पैशांचे काय झाले? कशासाठी ही फोडाफोडी केली? असा थेट सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादीशी युती करणे आणि राष्ट्रवादी पक्ष फोडणे ही त्यांची कुटनीती आहे, तो अधर्म नाही, असं भाजपकडून सांगण्यात येतं, असे राऊत म्हणाले. यावर उत्तर देताना ठाकरे म्हणाले, "ही कूटनीती आहे की मेतकूट नीती मला माहिती नाही. पण या कूटनीतीलाच आता कुटून टाकायची वेळ आलेली आहे."

Uddhav Thackeray Interview :
Uddhav Thackeray Interview: उद्धव ठाकरेंच्या स्फोटक मुलाखतीचा दुसरा टिझर प्रदर्शित; लवकरच राजकीय धमाका?

"सत्तालोलुपता, सत्ताभक्षक हेच शब्द मला या ठिकाणी योग्य वाटतात. जसे नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक आहेत. सत्तेला चटावले की त्यांनी त्यापुढे काहीही दिसतच नाही. सत्तालोलुपता या सत्ताधाऱ्यांमध्ये आली आहे. सत्तेपुढे यांना माणसेही दिसत नाहीत. महिलांवरील होणारे अत्याचार दिसत नाही. वाढती महागाईचं काहीच बोलूच नका. हे महत्त्वाचे विषय त्यांना दिसत नाही. खोट्या भ्रमात सत्ता चालवत आहेत," असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com