Elphinstone Bridge's Near Citizen Meet Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : 'त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या'; एल्फिन्स्टन पुलाजवळील नागरिकांना ठाकरेंकडून मोठा दिलासा

Elphinstone Bridge's Near Project : मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना राज्य सरकारकडून घरे खाली करण्य‍ाची नोटीस राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 03 May : मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठा आधार दिला आहे. ‘जे तुमची घरं तोडायला येतील, त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या, अशा शब्दांत नागरिकांना दिलासा देताना ठाकरेंनी प्रशासनालाही खणखणीत इशारा दिल्याचे मानले जात आहे. आता सरकार या प्रकरणात कोणते पाऊल उचलते, हे पाहावे लागणार आहे.

या भेटीबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) अधिकृत एक्स पेजवर पोस्ट करून देण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकरणातील रहिवाशांकडेही मानवी दृष्टीकोनातून पाहिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकूणच राज ठाकरेंच्या भेटीनंतर एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना थोडासा धीर आला आहे.

एक्स पोस्टमध्ये मनसेने म्हटले आहे की, मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना राज्य सरकारकडून घरे खाली करण्य‍ाची नोटीस राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. पण, घरांची पुढील परिक्रमा कशी असेल, स्थलांतरीत घरे देण्याची माहिती न देता नागरिकांना त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत. येथील रहिवाशांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भेटून व्यथा मांडली आहे.

राज ठाकरे यांनी या प्रकरणात एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना नागरिकांना धीर देऊन ‘जो कोणी घरे पडायला येईल, त्याला सांगा राज ठाकरेंशी बोलणं झालंय. योग्य माहिती मिळाल्याशिवाय घरं खाली होणार नाहीत, अशी तंबीही राज ठाकरेंनी सरकारला दिली आहे. त्यामुळे एल्फिन्स्टन पुलाजवळील रहिवाश्यांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील एल्फिन्स्टन पुलाच्या प्रकल्पामुळे येथील 19 इमारतींंपैकी दोन इमारतींमधील नागरिक बाधित होणार आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दरबारात आपली समस्या मांडली होती.

ठाकरेंनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांना दिलासा देणारी भूमिका घेतली आहे. ‘जे अधिकारी घरे तोडायला येतील, त्यांना राज ठाकरेंशी बोलणं झालंय’ एवढं सांगा, असे सांगून राज ठाकरेंनी एक प्रकारे सरकारला कडक इशारा दिल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT