Shivsena UBT Politics: राज आणि उद्धव ठाकरे मैत्री पर्व...नाशिक का आहे सगळ्यात पुढे!

Uddhav Thackrey;Maharashtra's interest in Uddhav and Raj Thackeray coming together -शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे नाशिक रोड भागात कार्यकर्ते कामाला लागले असून स्वाक्षरी मोहीम सुरू आहे.
Raj Thackeray & Uddhav Thackeray Banner
Raj Thackeray & Uddhav Thackeray BannerSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र येण्यासाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यामुळे हा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात 'हॉट' विषय बनला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये या विषयावर उत्साहाचे वातावरण आहे.

मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाशिक शहरात सध्या एकच विषय चर्चेत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन नवे समीकरण तयार करावे अशी मागणी होत आहे. याबाबत नाशिकमध्ये यापूर्वीच फलक लावण्यात आले आहे

Raj Thackeray & Uddhav Thackeray Banner
Hussain Dalvai Politics: आमदार देवयानी फरांदे यांचा आरोप, हुसेन दलवाई यांना दंगल घडवायची होती का?

आता शहराच्या नाशिक रोड भागातही दोन्ही ठाकरे कुटुंबांनी एकत्र यावे असे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच राज आणि उद्धव ठाकरे यांचे बहुचर्चित छायाचित्र या फलकावर लावण्यात आले आहे. त्यामुळे हा फलक सध्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.

Raj Thackeray & Uddhav Thackeray Banner
Tanpure Cooperative Sugar Factory : बंद पडलेल्या 'तनपुरे'ची निवडणूक गाजणार; चार पॅनल मैदानात असणार

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा उपप्रमुख राजेंद्र ताजणे यांनी हे फलक लावले आहेत. कार्यकर्त्यांसह त्यांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावती यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना भेटून असे आवाहन करण्यात येत असल्याने सध्या तो चर्चेचा विषय आहे.

संदर्भात श्री ताजणे यांनी सध्या राज्यात अनैतिक राजकारण सुरू आहे. जनता पक्षाकडून सत्ता आणि संपत्तीचा दुरुपयोग करून शिवसेनेवर सर्व प्रकारचे हल्ले केले जात आहेत. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी हे वाईट राजकारण होत आहे.

या राजकारणाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यास सडेतोड उत्तर मिळेल. मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील नवे राजकारण उभे राहील. त्यासाठीच आम्ही सह्यांची मोहीम राबवत आहोत, असे ताजणे यांनी सांगितले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बहुतांशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने उत्साहात आहेत. मराठी अस्मितेचे राजकारण पुन्हा एकदा जोमात सुरू होईल. महाराष्ट्राला आज त्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांना प्रभावी पर्याय म्हणून ठाकरे बंधू एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे महानगर उपप्रमुख किरण डहाळे यांनी सांगितले.

एकंदरच नाशिक शहर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या राजकारणामुळे पुन्हा एकदा उत्साहित झाले आहे. आणि शिवसेना दोन्ही पक्षाचे पदाधिकारी याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष ठेवून आहेत. मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभावी राजकीय पर्यायांचा शोध त्यानिमित्ताने पूर्ण होऊ शकेल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com