Dada Bhuse, Mahendra Thorave Sarkarnama
मुंबई

Maharashtra Assembly : शिवसेनेचे दोन आमदार विधिमंडळाच्या लॉबीत भिडले; तर शंभूराज देसाई म्हणतात...

Clash in Shivsena MLA : मंत्री दादा भुसे आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील संघर्षाच्या बातमीने राज्यात खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News :

विधिमंडळाच्या प्रांगणात आज आक्रीत घडलं. शिवसेनेचे दोन आमदार विधिमंडळाच्या लॉबीत एकमेकांना भिडल्यानं खळबळ उडाली आहे. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे (रायगड) आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. त्यांच्यात आवाजदेखील वाढला. त्यानंतर भरत गोगावले आणि शंभूराज देसाईंनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे, तर शिवसेनेच्या नेत्यांनी काहीही झालं नसल्याचा आव आणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra Assembly Session)

मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आपले काम न केल्याने शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे (Mahendra Thorave) भुसेंवर चिडले होते. त्यानंतर दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर काहीही बोलणं टाळलं, तर शंभूराज देसाई यांनी कुठलाही वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले. आवाज वाढला म्हणजे भांडण नव्हे, असे शंभूराज देसाई म्हणाले.

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दादा भुसे यांच्याशी चर्चा केली. मात्र, दादा भुसे किंवा महेंद्र थोरवे यांनी त्यांची जाहीर भूमिका स्पष्ट केलेली नाही.

प्रताप सरनाईकांकडून सारवासारव

काही समज गैरसमज आहेत, पण वाद नाही. शेवटी आमदार ही व्यक्तीच असते, अशी सारवासारव प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केली.

संस्कार धुळीस मिळाले - आव्हाड

विधिमंडळातही पोलिस ठेवावे लागतील, अशी परिस्थिती आली आहे. सत्ताधारी पक्षांतील आमदारांमध्ये हमरातुमरी होणे हे दुर्दैवी आहे. विधिमंडळात जी संस्कृती हवी तीच आता धुळीस मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावर दिली.

मुख्यमंत्र्यांचं मौन

इतर वेळी स्वत:हून माध्यमांशी बोलणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात काहीही बोलणे टाळले. अधिवेशन सुरू आहे, त्याबाबत विचारा असे ते माध्यमांना म्हणाले आणि एवढे बोलून मुख्यमंत्री निघून गेले.

(Edited by Avinash Chandane)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT