Dada Bhuse, Mahendra Thorave Sarkarnama
मुंबई

Clash between Shivsena MLA : शाब्दिक चकमक झाल्याचा महेंद्र थोरवे यांचा दावा; तर काहीच झाले नाही, दादा भुसे यांचा खुलासा

सरकारनामा ब्यूरो

Dada Bhuse Vs Mahendra Thorave News :

विधिमंडळाच्या लॉबीत शिवसेनेचे दोन आमदार भिडल्यानं राज्यात खळबळ उडाली आहे. यावर विधानसभेतही जोरदार चर्चा झाली. मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे (रायगड) यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यांचे आवाज वाढले होते. हे दृष्य सर्वांनी पाहिलं. त्यांच्यात वाद सुरू असताना आमदार भरत गोगावले आणि मंत्री शंभूराज देसाईंनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. नंतर विरोधकांनी विधिमंडळात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. यासंदर्भात महेंद्र थोरवे यांनी दादा भुसेंवर अनेक आरोप केलेत, तर भुसे यांनी काहीही झालं नाही, असा दावा सभागृहात केला. (Maharashtra Assembly Session)

नक्की काय घडलं?

दादा भुसे यांना मतदारसंघातील कामाविषयी विचारले. त्यावर दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आवाज वाढवला, असे कर्जतचे आमदार (रायगड) महेंद्र थोरवे यांनी स्पष्ट केले. दोन महिन्यांपासून मतदारसंघातील एका कामाविषयी त्यांच्याकडे पाठपुरावा करत आहे. तरीही त्यांनी जाणीवपूर्वक काम केले नाही, असा आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनीही दादा भुसे यांना फोन करून हे काम करण्याविषयी सांगितले होते. तरीही दादा भुसे यांनी काम केले नाही. या वेळी दादा भुसे यांना विचारले तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज वेगळी होती. त्यामुळे आमच्यात शाब्दिक चकमक झाली, अशी माहिती आमदार थोरवे यांनी दिली.

दादा भुसे यांच्यात नकारात्मकता आहे. त्यांच्याबद्दल इतरही आमदार सांगतील. ते आमदारांशी चांगले वागत नाहीत. बाकीचे मंत्री चांगले काम करत आहेत. दादा भुसे खूप शिष्ट आहेत. त्यांच्या कामाची पद्धत चुकीची आहे, असे आरोप महेंद्र थोरवे यांनी केले आहेत. दादा भुसे यांनी आमदारांचा आदर ठेवला पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दादा भुसे यांनी आरोप फेटाळले

शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी वादविवाद झाल्याचा आरोप दादा भुसे यांनी विधानसभेत फेटाळला. दादा भुसे यांनी यासंदर्भातील सर्व आरोप फेटाळले. थोरवे हे माझे सहकारी मित्र आहेत. सीसीटीव्ही वगैरे सर्व पाहा. माझी काहीच हरकत नाही, असेही दादा भुसे यांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT