Devendra Fadnavis and CM Uddhav Thackeray
Devendra Fadnavis and CM Uddhav Thackeray 
मुंबई

गुंडे प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरेंची एन्ट्री; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो

मुंबई : नीरज गुंडे (Neeraj Gunde) हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) 'वाझे' होता, त्याच्या घरातून फडणवीसांचे मायाजाल चालत होते, असा धक्कादायक आरोपही मलिकांनी केला आहे. त्यावर फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आमचे गुंडे यांच्याशी संबंध असल्याचे कबूल करत फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या प्रकरणात ओढले आहे.

मलिकांच्या आरोपांना फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. ते म्हणाले, नीरज गुंडे यांच्याशी आमचे संबंध आहेत. आम्ही ते नाकारत नाही. पण मी जेवढ्यावेळी त्यांच्या घरी गेलो, त्यापेक्षा अधिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेले आहेत. आम्ही जेवढ्या वेळा मातोश्रीवर गेलो, त्यापेक्षा अधिक वेळा गुंडे हे गेले आहेत. त्यामुळे मलिकांनी गुंडे यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांशी आधी चर्चा करायला हवी होती.

नीरज गुंडे यांच्यावर एकही केस नाही. त्यांच्याविरोधात एकही तक्रार नाही. गुंडे हे रोज राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढतात. त्यावर ट्विट करतात. मलिकांमध्ये हिंमत असेल तर मानहानीची केस दाखल करावी. त्यांच्याविषयी बोलताना आधी पुरावे द्यावेत. वाझे पाळण्याची सवय आम्हाला नाही. ती सवय तुम्हाला आहे, असं टीकास्त्र सोडत फडणवीसांनी मलिक यांना प्रत्युत्तर दिलं.

दरम्यान, मलिक म्हणाले होते की, फडणवीस मुख्यमंत्री असताना नीरज गुंडें याना पूर्णपणे सर्वत्र संचार होता. देवेंद्रजींचा मायाजाल त्याच्या घरातूनच चालत होता. सीबीआय, प्राप्तीकर, ईडी, एनसीबी या सर्वच कार्यालयात गुंडे हे देवेंद्रजींचा वाझे बनून सर्व कार्यालयात फिरत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांतही कोट्यवधी रुपये वसूल केले जात आहे. मंत्रालयात सर्व विभागात त्यांचा संचार होता. मागील 14 वर्षांत वानखेडे यांच्या अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. एनसीबीमध्ये वानखेडे यांना आणण्यामागे फडणवीस हेच आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.

बॉलीवूडमधील निर्दोष लोकांना फसवले जावे, ड्रग्जचा खेळ खेळला जावा, यासाठी वानखेडे यांना आणण्यात आले. क्रूझवरील काशिफ खानला सोडले जाते, इतर आणकी काहींना सोडले जाते. देवेंद्रजीच्या इशाऱ्यावर हे सुरू आहे. प्रतिक गाबाला का सोडले. या शहरात तो काय करतो. या खेळात त्याची सर्वात मोठी भूमिका आहे. ड्रग्जच्या खेळाचा मास्टरमाईंड आहे. त्याच्याबाबत नंतर सांगणार असल्याचेही मलिक यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT