अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर पलटवार

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व नीरज गुंडे (Niraj Gunde) यांच्या संबंधांविषयी आरोप केले आहेत.
Amruta Fadanvis
Amruta Fadanvis

मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरून (Cruise Drug Case) आता राज्यातील राजकारण चांगलचं तापल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक दररोज नवनवे आरोप करत आहेत. रविवारी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व नीरज गुंडे (Niraj Gunde) यांच्या संबंधांविषयी आरोप केले होते. आता थेट एका ड्रग्ज पेडलरशी त्यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. यात त्यांनी नाव न घेता फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.

आज सकाळी पत्रकार परिषदेत नबाव मलिकांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व नीरज गुंडे (Niraj Gunde) यांच्या संबंधांविषयी आरोप केले आहेत. आता थेट एका ड्रग्ज पेडलरशी त्यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे.

या आरोपांवर आता अमृता फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्विट करत मलिकांवर टिकेचा आसूड ओढला आहे. "चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा ? कारण *विनाशकाले विपरीत बुद्धी* असते !'' असे म्हणत त्यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.

तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनीही या आरोपांना उत्तर दिले आहे. जावयावर केलेल्या कारवाईमुळे आलेल्या नैराश्यातून, वैफल्यातून नवाब मलिक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करत आहेत. सकाळी उठून काहीतरी आरोप करणे, ट्विट करुन खळबळ माजवण्याचा खेळ सुरु आहे, हे रोजचे झाले आहे, त्यांचे हे बेताल वागणे अत्यंत चूकीचे असल्याचे दरेकरांनी म्हटले आहे. "व्यक्तीगत आरोप, जातीवरुन बोलणं हा भंग आहे. समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम आहेत, कोण कुठल्या जातीत जन्माला येतो,हा अट्टहास कशासाठी? असा सवाल करत दरेकरांनी नवाब मलिक यांनी शपथेचा भंग केला असल्याचा आरोपही यावेळी दरेकरांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com