CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On MVA : उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदवरुन 'मविआ'ला धक्का दिल्यानंतर सीएम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,...

Political News : शनिवारचा महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही राजकीय पक्षाला अशाप्रकारे बंद करण्याची परवानगी नाही, असा महत्त्वाचा निकाल उच्च न्यायालयाने दिला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया देताना विरोधकांना खडे बोल सुनावले.

Sachin Waghmare

Mumbai News : महाविकास आघाडीने शनिवारी जाहीर केलेल्या बंदविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय देताना राज्यातील महाविकास आघाडीला मोठा दणका दिला. त्यासोबतच शनिवारचा महाराष्ट्र बंद हा बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत कोणत्याही राजकीय पक्षाला अशाप्रकारे बंद करण्याची परवानगी नाही, असा महत्त्वाचा निकाल दिला.

येत्या काळात जर कोणी तसा प्रयत्न करत असेल, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पहिली प्रतिक्रिया देताना विरोधकांना खडे बोल सुनावले.

विरोधकांकडून महाराष्ट्र बंद करण्याचा प्रकार सुरु आहे. 'येत्या काळात हे राजकारण बंद करा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. या बंदला बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. कोर्टाने म्हटलय अशा बंदला परवानगी देता येणार नाही. ही कोर्टाने हाणलेली चपराक आहे. मागे सुद्धा कोर्टाने दंड लावलेला, त्यातून सुधरा', यावर पहिली प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

लाडकी बहिण योजनेचे राजकारण करुन समाजात द्वेष पसरवण्याच काम विरोधक करत आहेत. बदलापुरची घटना घडल्यानंतर आम्ही सगळ्या लोकांनी मिळून घटनेची गंभीर दखल घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू. कुठल्याही परिस्थितीत आरोपीला सोडणार नाही. हे सरकार संवेदनशील आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

विरोधकाचे काही तरी सुरु आहे? राज्यात काहीतरी भंयकर घडवण्याचा प्रयत्न आहे. कोणी म्हणतं बांग्लादेश होईल. पुरोगामी महाराष्ट्रात आहे हा मतांसाठी, सत्तेसाठी एवढ्या खालच्या पताळीवर जाऊन प्रचार करता. तुम्ही संवेदनशील असाल, तर या दुर्देवी घटनेच राजकारण बंद करायला पाहिजे,असेही प्रसार माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

'दुर्देवी घटनेचे राजकारण करू नका'

बदलापूरमधील या दुर्देवी घटनेचे राजकारण बहिणी कधीही खपवून घेणार नाहीत. हा विश्वास आम्हाला आहे. महाराष्ट्रात जे सत्तेला हपापलेले आहेत, ते बंदच्या निमित्ताने कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करतायत. हे महाराष्ट्र खपवून घेणार नाही. सर्वसामान्य जनता यात भरडली जात आहे. जनतेला वेठीस धरु नका, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT