Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

CM Shinde Speech : छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली; मुख्यमंत्र्यांकडून जरांगे-पाटलांचं कौतुक

Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं.

Ganesh Thombare

Mumbai News: मनोज जरांगे-पाटलांच्या आंदोलनाला मोठं यश आलं आहे. मराठा समाजासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या सर्व प्रमुख मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. तसेच याबाबतचा अध्यादेशदेखील जारी करण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हा अध्यादेश जरांगे-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सोडलं. (CM Eknath Shinde Speech On Manoj Jarange Patil Mumbai Morcha)

यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे मनापासून अभिनंदन केलं. तसेच मनोज जरांगे-पाटील यांनी केलेल्या कोणत्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या, ते भरसभेत वाचून दाखवलं. त्यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, त्यांच्या 'सग्या-सोयऱ्यांना' कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य केल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच आपण जाहीरपणे छत्रपती शिवाजीमहाराजांची घेतलली शपथ पूर्ण केली, आपण दिलेला शब्द पाळतो, असंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या विजयी सभेत भूमिका मांडताना मनोज जरांगे-पाटील यांच्या कार्याचं कौतुकदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं.

तसेच मराठा समाजाने आपल्या हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शांततेत आंदोलन केले, त्याबाबत आभार मानले. याबरोबरच आपण दिलेला शब्द पाळतो, जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो. आपल्या देशाचं लक्ष आपल्या या आंदोलनाकडे लागलं होतं. आपली ही एकजूट कायम ठेवली. आपण हे आंदोलन हे मनोज जंरागे-पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन यशस्वी केलं. त्याबद्दल मनापासून धन्यवाद, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT