Manoj Jarange Speech On Maratha Reservation : 'विजयी गुलालाचा अपमान होणार नाही...'; जरांगेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार!

Manoj Jarange Speech On Maratha Reservation : सगळ्या सग्या-सोयऱ्यांना मराठा आरक्षण...
Manoj Jarange Speech On Maratha Reservation
Manoj Jarange Speech On Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा समाज आरक्षणासाठी आर - पारची लढाई पुकारणारे मनोज जरांगेंच्या लढाईला अखेर यश आले आहे. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या आता मान्य करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे हे वाशी येथे विजयी सभेत एकत्र आले आहेत. या ठिकाणी विजयी सभा होते आहे. यावेळी जरांगे यांनी मराठाबांधवांना संबोधित केलं आहे. (Manoj Jarange Speech On Maratha Reservation)

Manoj Jarange Speech On Maratha Reservation
NCP : संदीप पाटलांच्या खांद्यावरून आमदार मिटकरींचा नेम; असा केला जिल्हाध्यक्षाचा ‘गेम’

यावेळी जरांगे म्हणाले, "महाराष्ट्रातून मानाचा जय शिवराय, या लढाईसाठी संघर्ष सुरू होता. त्याला आज यश मिळालं आहे. ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या वाटप करण्यात यावे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्या परिवारीतील सर्व सदस्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्या आधारावर त्यांच्या सर्व सग्या-सोयऱ्यांनाही आरक्षण मिळायला हवे.

Manoj Jarange Speech On Maratha Reservation
Manoj Jarange on Maratha Reservation : 21 व्या शतकातील पानिपतचा यशस्वी लढा; मराठा आंदोलकांची भावना !

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मराठा आरक्षणासाठी अध्यादेश येणं आवश्यक होते. मराठा आरक्षणासाठी समाजाने अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. 300 पेक्षा जास्त तरुणांनी यासाठी बलिदान दिलं आहे. त्याग केला आहे. यांचं स्वप्न साकारण्याची जबाबदारी आपल्या मराठा समाजावर जबाबदारी होती. आरक्षणासाठी समिती स्थापन केली गेली. आता अध्यादेशानुसार नोंदी सापडलेल्यांच्या आधारावर त्यांच्या सग्या-सोयऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावे. नोंदीच्या आधारे गणगोतातील सगे-सोयरे यांना देण्यात यावं, या अध्यादेशासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मनापासून धन्यवाद, असे जरांगे म्हणाले.

"मी मराठा समाजाला एक मुलगा म्हणून शब्द दिला होता. हा संघर्ष वाया जाऊ देणार नाही. माझी मुख्यमंत्र्यांकडे एक विनंती आहे. जो सग्या-सोयऱ्यांचा अध्यादेश झालाय, ज्यांच्या कुणबी नोंद मिळाली. त्या प्रमाणपत्राच्या आधारावर गणगोतातील सगळ्याच सग्या-सोयऱ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. या विजयी गुलालाचा आपमान होणार नाही, एवढी दक्षता घ्या," असे जरांगे म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com