Maratha Reservation : आरक्षणाच्या अध्यादेशाला धोका झाला तर... मनोज जरांगे पाटलांचा दम

Manoj Jarange Patil : मराठा समाजाला शांततेत जल्लोष करण्याचा दिला सल्ला.
Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange Maratha Morcha : Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण रात्रंदिवस एक केला. शनिवारचा दिवस (ता. 27) हा या लढ्याच्या विजयाचा गुलाल उधळण्याचा दिवस आहे. या गुलालाच्या आनंदोत्सवाला गालबोट लागू देऊ नका, असे मनोज जरांगे-पाटील यांनी नमूद करीत मराठा समाजाला संयमाचा सल्ला दिला. समाजबांधवांना संबोधित करताना जरांगे-पाटलांनी सरकारला इशाराही देऊन टाकला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे मराठा आरक्षण मिळाले आहे. मात्र आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबत कोणीही दगाफटका केल्यास आपण सर्वप्रथम मुंबईत धडक देऊ, असा सज्जड दमही मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला.

Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange on Maratha Reservation : अखेर मनोज जरांगे जिंकले; सरकारकडून सर्व मागण्या मान्य; गुलाल उधळणार...

मुंबईतील वाशी येथे सभेला संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यात काही जण मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मराठा समाज आणि ओबीसींनी सामंजस्य दाखवावे. महाराष्ट्रात असा कोणताही वाद अस्तित्वात नाही. त्यामुळे जो वाद कधी अस्तित्वातच नव्हता त्याला हवा देण्याचे काम करू नका, असे कळकळीचे आवाहन आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर आंदोलने झाली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही आंदोलने करण्यात आल्याबद्दल जरांगे-पाटलांनी मराठा समाजाचे आभार मानले. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करीत आहे. त्यामुळे समाजाच्या या विजयोत्सवात सहभागी होण्यासाठी आपणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली होती. शिंदे यांनी ही विनंती मान्य करीत सभेला उपस्थित राहिल्याबद्दलही जरांगे यांनी आभार व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रातील ओबीसी आणि मराठा गावांमध्ये एकत्रपणाने राहतो. ओबीसींच्या हक्कावर मराठा समाजाला गदा आणायची नाही. मराठा समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. हा लढा राज्यभरातील मराठा समाजाने पाठिंबा दिल्यानेच यशस्वी झाल्याचे मनोज जरांगे-पाटील म्हणाले. कोपर्डीतील दुर्दैवी घटनेबाबतही सरकार पाठपुरावा करणार आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने वेगाने पावले उचलली आहेत. सरकार टिकणारे आरक्षण देत आहे, याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला.

मराठा समाजाच्या सग्या-सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढला आहे. त्यानुसार कार्यवाही झाली पाहिजे. मराठा आरक्षणासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. अशा मराठाबांधवांना सरकारने वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणीही मनोज जरांगे-पाटलांनी यावेळी दिली. सरकार हे मायबाप असते. मराठा समाज हा सरकारसाठी लेकरासारखा आहे. त्यामुळे लेकरं बापासमोरच रडतील, हट्ट करतील. सरकारने या रास्त हट्टाकडे लक्ष पुरवावे, असेही मनोज जरांगे-पाटील म्हणाले.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Manoj Jarange Maratha Morcha :
Manoj Jarange Mumbai Morcha : मागण्या मान्य, मनोज जरांगेंच्या विजयी सभेला मुख्यमंत्री निघाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com