Eknath Shinde On Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Thackeray: महाकलंक तर तुम्ही आहात; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Kalank Word Controversy: "सत्तेचा अमरपट्टी कुणीही घेऊन आलेला नाही...

सरकारनामा ब्यूरो

Thane News: राज्यातील राजकीय घडामोडीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजव्यापी दौऱ्याला ठाण्यातून सुरूवात केली आहे.यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

एकनाथ शिंदे म्हणाले की जेव्हा जेव्हा अन्याय होतो, तेव्हा तेव्हा एकनाथ शिंदे जन्म घेतो,असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. अन्यायाविरोधात लढा, पेटून उठा, अशी शिकवण आपल्याला बाळासाहेब ठाकरेंनीच दिली. मुख्यमंत्री होईन असं माझ्या मनातही नव्हतं. त्या काळात परिस्थिती तशी होती. आपल्या डोळ्यांदेखत सैनिकांचं खच्चीकरण होत होतं. अनेक गुन्हे आणि तडीपार लादले जात होते. मोक्कासारख्या कारवाया तरूणांवर होत होत्या. मग ती सत्ता काय कामाची?

एकनाथ शिंदे म्हणाले, "लोकं सत्तेकडे जातात पण सत्तेतून पायउतार होणारे मंत्रीपदी असणारे लोक या एकनाथ शिंदेंसोबत पायउतार झाले. मला कुणीही विचारलं नाही. त्यानंतर काय होणार, कसं होणारं हे देखील कुणीही मला विचारलं नाही. जगाच्या इतिहासात असं उदाहरण कुठेही मिळणार नाही की, सत्तेमध्ये आणि मंत्रीपदी असलेली सर्वजण पायउतार झाले. पुढे काय होणार ते सुद्धा माहिती नव्हतं. परंतु आम्ही लढण्याचा निर्णय घेतला. लढून एकतर जिंकू किंवा शहीद होऊ, पण आम्ही जो निर्णय घेतला तो सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी घेतला. या राज्यातल्या जनतेसाठी आपण घेतला. स्वत:च्या स्वार्थासाठी घेतला नाही,"

"सत्तेचा अमरपट्टी कुणीही घेऊन आलेला नाही. जेव्हा आपल्याकडे काही अधिकार असतात, तेव्हा त्याचा वापर सर्वसामान्य लोकांच्या जीवनासाठी करा. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी करा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. "देवेंद्र फडणवीसांना तुम्ही कलंक म्हणता. पण या देवेंद्रजींनी मनाचा मोठेपणा दाखवून मला सांगितले की, एकनाथजी तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. त्यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारलं. याला मनाचा मोठेपणा लागतो. महाकलंक तर तुम्ही आहात," अशा शब्दात शिंदेंनी ठाकरेंवर टीकास्त्र डागले.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT